You are currently viewing वसुंधरा दिन

वसुंधरा दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*वसुंधरा दिन*

वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन मंडेला यांनी मांडली. त्यांनी पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा ऱ्हास या मुद्द्यांवर तेथील सर्व थरातील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी वने, आणि वन्यजीव निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे राजकीय दबाव निर्माण झाला. आणि १९७० सालापासून *अर्थ डे* म्हणजेच *वसुंधरा दिन* २२ एप्रिल रोजी जगभर साजरा केला जात आहे.
वाढते प्रदूषण, विकासाच्या अवास्तव कल्पना, अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्यस्थिती मागील मुख्य कारण आहे. अवकाळी पाऊस, वाढते तापमान अकल्पित नैसर्गिक वादळे, भूकंप जंगलातले वणवे,भूजल पातळी खालावणे, या सगळ्यांचं मूळ कारण म्हणजे पर्यावरणाचा न साधलेला समतोल.
*माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू शकते पण लोभ नसावा* अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे. विकासाच्या भ्रामक कल्पनांपायी पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अविचारी वापर केल्याने वाढत्या प्रदूषणाचे परिणाम दिसत आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवी जीवनाचे भविष्य अंधकारमय आहे हे निश्चित. याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.
पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे याचे स्मरण करून देणे हे या वसुंधरा दिना मागचे उद्दिष्ट आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात सर्वात मोठी भूमिका आहे ती जंगलची. मधल्या काही वर्षांमध्ये वाढती लोकसंख्या, वाढत्या गरजा, रस्ते, दळणवळण यानिमित्ताने प्रचंड वृक्षतोड झाली. रानेच्या राने उद्ध्वस्त झाली. वन्य जीवांच्या वसाहती असुरक्षित झाल्या, पर्जन्यमान विस्कटले आणि सारा नैसर्गिक तोलच ढासळला. आता गरज आहे ती याविषयी अत्यंत सावध राहण्याची. पर्यावरण जागृती हा पृथ्वीवरच्या प्रत्येकाचा महामंत्र बनला पाहिजे.
भरपूर झाडे लावा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गाने जंगलतोड वाचवा, पर्वत नद्या यांचा पर्यावरणातला सहभाग लक्षात घ्या, आणि त्यानुसार योग्य जीवनशैली राखून सर्वांगीण जागृती व प्रसार करणे ही या वसुंधरा दिन साजरा करण्यामागची खरी संकल्पना आहे.
प्लास्टिक आणि ई कचरा या सध्याच्या जागतिक समस्या आहेत. ज्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढत आहे. माऊस, कीबोर्ड, मोबाईलचे खराब झालेले स्पेअर पार्ट्स, किंवा सध्याच्या स्थितीत न चालणारी उपकरणे ही या ई कचरा प्रकारात येतात. जुन्या डिझाईनचे कम्प्युटर, मोबाईल फोन, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल आणि अन्य उपकरणे हा सुद्धा ई-कचराच आहे. हा कचरा जाळल्यास यातून निघणाऱ्या घातक वायूमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. शिवाय मानवी आरोग्यासाठीही हे धोकादायक आहे.

प्लास्टिक हे सर्वात घातक असे प्रदूषक आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस माऊंट एव्हरेस्ट पासून समुद्राच्या तळापर्यंत अनेक पर्यावरणीय कोनाड्यांचे प्लास्टिकने प्रदूषण केले आहे. प्राण्यांच्या अन्नामधून त्यांच्या पोटात प्लास्टिक जाणे अथवा ड्रेनेज सिस्टीम मध्ये अडकून सखलभागात पूर येणे, जागोजाग साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे परिसरातील सौंदर्य नष्ट होणे वगैरे अशा कितीतरी बाबींचा जाणीवपूर्वक आणि पर्यावरण पूरक अभ्यास हा झालाच पाहिजे आणि त्यावर उपाय यंत्रणा उभारली पाहिजे. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने या महत्त्वाच्या समस्येवर प्रकाश टाकला जावा ही अपेक्षा.

हरितगृह वायू म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साईड, ओझोन व पाण्याची वाफ. मात्र यांचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. यांचे वातावरणातले वाढते प्रमाण ही सध्याची ज्वलंत समस्या आहे. औद्योगिक क्रांती झाली, मात्र या हरितवायूंचा समतोल ढासळून पृथ्वीचे पर्यावरण धोक्यात आले आहे. जीवाश्म इंधन, (पेट्रोल डिझेल वगैरे) कोळसा, तेल, जंगलतोड, जमीन वापरातील बदल, मातीची धूप, शेती, पशुधन, घनकचरा, सांडपाणी या द्वारे मानववंशिक वायूंचे उत्सर्जन होते. पृथ्वीच्या वातावरणात होणारा बदल आणि उपरोक्त घटक यांचा समन्वय योग्य रीतीने साधला गेला पाहिजे.नुकतीच दुबईत झालेली ढगफुटी आणि प्रचंड पाऊस हा याचाच परिणाम असू शकतो. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या आणि पर्यायाने निसर्गनियमाच्या विरोधात केलेल्या खटाटोपाचाही हा परिणाम असू शकतो.
साऱ्या जगाचे डोळे आता उघडले आहेत. अनेक जागतिक परिषदा घडत असतात, उपाययोजनांचे आराखडे आखले जातात पण सारे फक्त कागदावर राहते. वसुंधरा दिनानिमित्त यावर प्रत्यक्ष ठोसपणे पाऊले उचलणे जरुरीचे आहे.
त्यासाठी आपण बरेच काही करू शकतो सर्व प्रसार माध्यमातून समाज जागृती करणे, पर्यावरण मित्र गट बनवून प्रदर्शने, स्पर्धा, चित्रपटांच्या माध्यमातून प्रबोधन करणे, शक्यतो नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब करणे, पर्यावरण संरक्षण संबंधित अभ्यासक्रम बनवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवणे वेळ पडल्यास सक्ती करणे.. अशा अनेक माध्यमातून प्रयत्न व्हायला हवेत.वसुंधरा दिनाच्या निमित्ताने निसर्ग संवर्धन व्हावे हीच अपेक्षा आणि एक महत्त्वाचं.. हे चरितचर्वण फक्त एका दिवसापुरताच मर्यादित नसावं तर ती मानवाची आचार संहिता ठरावी हा दुर्दम्य आशावाद बाळगूया.
वसुंधरा दिनाच्या पृथ्वीवासीयांना लाख लाख शुभेच्छा!

*राधिका भांडारकर*

*संवाद मीडिया*

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*Once in a lifetime offer*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी करीता
✅ *आरटीओ टॅक्स फ्री* ✅

♻️♻️ *OMG it’s CNG* ♻️♻️
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी..

♻️ *CNG भी Automatic भी* ♻️
🆕 *सीएनजी* मध्ये पहिल्यांदाच *ॲटोमॅटिक* पर्याय देखिल उपलब्ध

✅महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
✅*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
✅*प्रती किमी ₹.३.५०/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
✅ 💪🏼*देशाची एकमेव ४ आणि ५ स्टार ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग ने परिपूर्ण सीएनजी कार*💪🏼
✅आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
✅सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*सर्व ॲाफर करीता नियम व अटी लागु.*
जाणून घेणेसाठी आजच संपर्क करा

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/133162/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा