You are currently viewing माझा देश भारत – कवयित्री दुर्वा दत्ताराम नाटेकर* इयत्ता चौथी केंद्र शाळाबांदा नं१ ता.सावंतवाडी

माझा देश भारत – कवयित्री दुर्वा दत्ताराम नाटेकर* इयत्ता चौथी केंद्र शाळाबांदा नं१ ता.सावंतवाडी

माझा देश भारत
उर्फ हिंदुस्थान ||१||

विविधतेने नटलेला
एकतेने सजलेला ||२||
माझा भारत

ज्याच्यासाठी शूरवीरांनी
अर्पिले आपले प्राण ||३||
तोच माझा भारत

गंगा, यमुना वाहती
ज्याच्या कुशीत ||४||
तोच माझा भारत

हिमालयाची शिखरे
राहती ज्याच्या सहवासात ||५||
तोच माझा भारत

सुंदर शेती पिकती
ज्याच्या भुमिवरती ||६||
तोच माझा भारत

शौर्याने, बुद्धीने
परंपरेने भरलेला देश ||७||
माझा भारत

सर्वांना वाटतो
ज्याचा अभिमान ||८||
तोच माझा भारत

सर्वांना प्रिय आहे
जो देश ||९||
तोच माझा भारत देश
तोच माझा भारत देश
*कवयित्री दुर्वा दत्ताराम नाटेकर*
इयत्ता चौथी
केंद्र शाळाबांदा नं१ ता.सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =