You are currently viewing माझे गाव कापडणे ….

माझे गाव कापडणे ….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*१५).माझे गाव कापडणे ….*

( असे होते व्यवस्थापन )

हे लिहिण्यापूर्वी मला ही वाटले नव्हते की माझ्या मनाच्या तळाशी इतक्या गोष्टी साचून
पडून आहेत.जसजशी लिहिते आहे तस तसे मला ही आश्चर्य वाटते आहे.आज शिकलेल्या
लोकांकडे मॅनेजमेंट इव्हेंट नावाचा प्रकार असतो.त्या साठी खास प्रशिक्षित लोक असतात. मला नवल वाटते माझ्या लहानपणी
दोन अडाणी,( शाळेत न गेलेल्या विधवा बायका आमच्या अर्ध्या गावातील कापूस वेचणी पासून सर्वच गोष्टींचे इव्हेंट मॅनेजमेंट करत होत्या हे कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही.

पूर्वी लग्नाचे वय नऊ ते अकरा. अकराची ही
घोडनवरी ठरत असे.बाल मृत्युचे प्रमाणही लक्षणिय होते.त्यातून पटकी कॅालरा मलेरिया
देवी प्लेग यांचे थैमान चालू असे.अक्षरश: प्रेतं
पोहोचवायलाही माणसं मिळत नसत इतक्या
वेगात कॅालरात माणसे मरत असत. मला आठवते, एकदा मी लहान असतांना आमच्या
घरी घाई घाईत माणसे आली व म्हणाली..
“ भाऊ भाऊ चला लवकर, हगवणीने माणसे मरत आहेत.वडिलांनी घाई घाई कपडे केले नि
निघाले.

शाळेत बरेच लोक जमा केले. पटापट खाटा
बोलावल्या व रूग्ण दाखल होऊ लागले. गावातले डॅाक्टर होतेच पण भाऊंनी धुळ्याहून
सिव्हिल मधून डॅाक्टर्स व नर्सेसची टीम बोलावली व भराभर रूग्णांवर उपचार सुरू झाले. अशा वेळी गावात कोलाहल माजून एकच हल्लाकल्लोळ उठत असे. भाऊ हाच एक आधार लोकांना उरत असे. वडिलांचे व्यक्तिमत्व व कामाचा झपाटा एवढा जबरदस्त होता की पटापट यंत्रणा हलत असे.
बरीच पडझड होऊन कॅालरा परतत असे. रूग्णाच्या पोटातले पाणी कमी होऊन रूग्ण
मान टाकून गतप्राण होत असे त्यामुळे अडाणी
गांवकरी व स्त्रिया या साथीला “मानमोडी” उनी
असे म्हणत असत.एवढी सगळी मॅनेजमेंट वडिल एकटे सक्षमपणे यंत्रणा राबवत बघत असत.जणू गावाचा देवदूत म्हणून त्यांचा वावर
असे.साक्षात परमेश्वरच म्हणाना! एवढे गांवकरी त्यांच्यावर विसंबून असत.काही ही झाले की चला भाऊंकडे…!

ही झाली वडिलांची मॅनेजमेंट पण मघाशी मी
वर म्हटल्या प्रमाणे दोन बालविधवा आत्या त्याही, शाळेत न गेलेल्या(पण अनुभव व कठोर
सामाजिक वास्तवात भाजून निघालेल्या)दोघी
शेतातील कापूस वेचणी पासून ते निंदणी पर्यंत साऱ्या कामांची इव्हेंट मॅनेजमेंट या दोघी विधवा महिला सांभाळत होत्या. म्हणजे उद्या
आम्हाला कापूस वेचणीला दहा बायका हव्या
असतील तर मी संध्याकाळी जाऊन सांगत असे, उद्या भाऊंकडे कपाशी वेचायला दहा बायका हव्या. तर बरोबर दहा बायका आमच्या
शेताच्या रस्त्याला लागायच्या व शेतात पोहोचायच्या.आणि अशा अनेक शेतांवर बायका रवाना व्हायच्या.

आणि एक आठवड्या नंतर सर्व महिला आत्याच्या घरी जमून त्या सर्वांचा हिशोब होऊन प्रत्येकीचा आठवड्याचा पगार मिळायचा. अनुभवाच्या व व्यवहाराच्या शाळेत शिक्षण लागत नाही व त्यांचे काही अडतही नाही. माझा शाळेचं तोंड न पाहिलेला ड्रायव्हर, पैशांचा हिशोब मी चुकते पण तो चुकत नाही.तशाच या बायका प्रत्येकीचा हिशोब करून तेवढे रूपये त्यांना बरोबर देत असत. एक दिवस आमच्याकडील पैसे घेऊन मी तिथे हजर होते व सर्व गंमत पाहिली होती.जोडीला
एक थोडे लिहिता वाचता येणारी बाई बसलेली असे व कोणाला किती पैसे दिले तेवढे ती लिहून घेत असे. म्हणजे दिलेले पैसे तरी लक्षात ठेवायला नकोत. त्या काळी अकाली विधवा होऊन मुली भावाकडे रहात असत. पुनर्विवाहाची सोयच नव्हती. तो विचारच नव्हता. उभे आयुष्य असे काढायचे. विधुराने मात्र तेराव्या दिवशी बोहोल्यावर उभे रहायचे.

पुरूषप्रधान संस्कृतीत स्रियांच्या बाबतीत समाज इतका कठोर का होता? हे मला न उलगडणारे कोडे आहे. केवळ दास्यत्व वा दासी म्हणून व केवळ एक भोग्यवस्तू एवढीच
स्त्रिची किंमत का होती? का तिला इतका जांच व खालचा दर्जा होता. वास्तविक वयात आल्या पासून स्त्रियांना अनेक नकोशा समस्यांचा सामना करावा लागतो. पण प्राक्तन म्हणून तिने हे सारे स्वीकारल्यानंतर थोडी तरी
सहानुभूतीची नजर ? छे! ते तर दुरच पण किमान मन असलेला माणूस म्हणूनही तिचा कधी विचार झाला नाही किंबहुना टिळकांनी
उघड्या डोळ्यांनी पाहून डोळ्यावर कातडे ओढून मूग गिळून बसले व या प्रश्नावर कधी
तोंडतर उघडले नाहीच पण जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले की काय अशीही शंका यावी इतपत ही मंडळी बेफिकिरीने वागली, ह्याला काय म्हणावे? घरोघर खेडोपाडी स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनिय होती. कापडणे ही याला
अपवाद नव्हते. बऱ्याच घरात बालविधवा होत्या व अशी कामे शेतीवाडी दळणकांडण
अंगावर घेऊन माहेरी दिवस कंठत होत्या.
अर्थात नवराही काही फार सुख देत होता अशातला भाग नव्हता. वरून सासवा नणंदांचा जाच होताच. कसलं नशिब घेऊन येतात हो बायका?

आमचे लग्न १९६८ला झाले. बघा त्या वेळी सुद्धा आमच्या शेजारी दोन कुटुंबात बायकांना
अमानुष मारझोड होत असे. शेजारून आवाज
आला की माझा जीव पाणी पाणी होत असे. (एकदा फार वर्षांनंतर एका लग्नात ते शेजारचे गृहस्थ भेटल्यावर इतक्या वर्षांनी सुद्धा तो विषय काढून मी त्यांना फटकारलेच, हो आता माझी भीड चेपली होती ना? काही बोलले नाही ते, गप्प बसले).पण मी पडले नविनच लग्न होऊन माजघरात वावरणारी सुन, मी काय करू शकणार होते?
मोठेच कानाडोळा करत त्यात मी तर नविनच!
असे सामाजिक वास्तव इतक्या उशिराही होते तर बघा जुन्याकाळी काय स्थिती असेल? खरे तर स्त्रियाच स्त्रियांच्या जास्त शत्रू होत्या व आजही आहेत ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.त्या सुनेची सासू मुलगा सुनेला
मारत असतांनाही आवरत नसे, पेटवत असे.
शेजारी पाजारी मिरवत असे.सुनेकडून दिवसभर ढोर मेहनतीचे काम करवून घेत असे.

जाऊ द्या, मॅनेजमेंट इव्हेंटवरून विषय निघाला पण हे ही बोलायलाच हवे ना? मी काय बघितले ते! तर त्या दोन्ही आत्यांनी फार वर्षे
हे काम केले. ते ही बरेच झाले ना? दिवस कामात गुंतुन राहिल्यामुळे वेळ ही छान गेला नि
त्या कुणावर भार झाल्या नाहित ! एरव्ही भाऊ
किती ही चांगला असला तरी माहेरी दिवस काढणे सोपे का आहे? आणि भावजयीलाही
आपल्या संसारात कायमची अडचण नकोच
असते. तिचीही बाजू बरोबरच असते ना? काही
काही घरात अत्यंत वाईट सासवा मी पाहिल्या
ज्यांनी सुनांनी नांदूच दिले नाही अशा ही केसेस
खूप आहेत.माझ्या सासूने मला त्रास दिला ना?
मग हिला कसे सुखात राहू द्यायचे? दिवसाकाठी सुनेला मार बसला की त्यांचा आत्मा शांत होत असे. ह्या विधवांही दिवस काढत असत बिचाऱ्या, शेतात निंदणी खुरपणीला जाऊन मदत करत असत.ह्या ज्या
मजुरांचे व्यवस्थापन बघणाऱ्या आत्या होत्या
त्यांना मात्र व्यवस्थापनाचे पैसे मिळत असत,
प्रत्यक्ष शेतात कामावर न जाता. कारण त्यांना
मजुर वाटपाचे मोठे काम असे.आणि त्या शेतावर व्हिजिटलाही जात असत.

ह्या दोन आत्यांपैकी एक आत्या मोठी गमतीशीर होती मात्र.अतिशय खानदानी असलेल्या या बायकांची मुलेबाळे व्यवस्थित
होती. त्यांना घरातही मान होता कारण लहान वयातच नवरा गेल्यानंतर मोठ्या कष्टातून एकट्याने त्यांनी मुलांना मार्गी लावले होते.त्या
मुळे घरात त्यांचा शब्द प्रमाण होता व समाजातही त्यांना खूप आदराचे स्थान होते.
त्यांना ताई, बायजा या नावाने संबोधले जात असे.काही काम नसेल तेव्हा ही आत्या नकला खूप छान करत असे.विशेष म्हणजे दुपारी पुरूष माणसे घरात नसतांना पुरूषी वेषात ह्या नकला होत असत. त्या मुळे धम्माल होत असे. मी लहान असल्यामुळे मला फार काही
समजत नव्हते तरी जी गंमत व हास्य कल्लोळ चालत असे त्या वरून कळते की त्या आजुबाजुच्याच लोकांच्या नकला असाव्यात.घरभर धुमाकुळ व बघ्यांची गर्दी असे. नाही तरी पूर्वी मनोरंजनाची साधने
कुठे होती? कीर्तन भजन कलापथके तमाशा अशीच साधने होती फक्त.

आमच्या घरी रेडिओ येण्यापूर्वी वडिलांनी ग्रामोफोन आणला होता. त्या चौकोनी आकाराच्या ग्रामोफोनला हिज मास्टर्स व्हॅाईसचे चित्र व कान लावून गाणे ऐकणाऱ्या कुत्र्याचे चित्र लावलेले मोठे मजेशिर दिसत असे.एक गोल काळी बांगडी, काळ्या रंगाची,
त्याच्यावर सुई असलेला वाकडा दांडा टेकवला की व हॅन्डलने हवा भरली की गाणे
वाजायला सुरूवात व्हायची. जुनी गाणी, सैगलच्या काळातील, लोकांना खूप आवडत
असत. राज कुमारी, टुणटुण, गीता दत्त,रफी अशा
गायकांच्या त्या कॅसेट होत्या. मला त्या वेळी
ऐकलेले”राधा ना बोले ना बोले ना बोले रे” हे
गाणे चांगलेच आठवते.त्यातला तबला मी आज मोठा आवाज करून मुद्दाम ऐकते. मी चवथी पाचवित असेन तेव्हा आम्ही शिवण शिकवणाऱ्या बाईंकडे जात असू तेव्हा हे गाणं
समोरच्या घरात तेव्हा मोठ्याने वाजतांना आम्हाला ऐकू येत असे. धुळ्याला राहणारी ती
मंडळी होती, बोरसे मला वाटते.मला मी त्या
बाईंच्या ओट्यावर नव्या कापड्याच्या तुकड्यावर हेम टीप घालतांना व त्याच
वेळी समोरच्या घरातून जाळीच्या दारातून ह्या
गाण्याचे बोल ऐकतांना आता ही डोळ्यांसमोर
स्पष्ट दिसते.

असा एकूणच सुखाचा व शांततेचा तो काळ होता असे म्हणायला काहीच हरकत नाही. गाणी इतकी दुर्मिळ होती की जीवाचा कान करून आम्ही ऐकायचो. कधीतरी मी धुळ्याला गेले की आग्रा रोडला” कहीं दीप जले कहीं दिल “ चे लताचे आर्त सूर
कानावर पडत. मला माहित नाही का? पण मला लहानपणापासूनच गाण्याचा कान आहे.
त्या मुळे जीवाचे कान करून ते स्वर मी ऐकायचे इतक्या लहानपणी! आज ही तितक्याच तन्मयतेने ते गाणे मी ऐकते.ह्या गाण्याच्या आधी लताचा आवाज खोकल्यामुळे खराब होता असे म्हणतात. तरी
खूप वेळा गाऊनही त्यांचे समाधान होत नसल्या मुळे खूप रिटेक झाले व एका रिटेकलाच संगीतकाराने ते फायनल करून टाकले असे ते माझे आवडते गाणे आजही तेवढेच आवडते आहे.खूप गप्पा माराव्याशा वाटतात तुमच्याशी..! जाऊ मग आता?
भेटू पुढच्या रविवारी, “आपला महाराष्ट्र “मध्ये…

धन्यवाद मंडळी..

आपलीच,
प्रा.सौ.सुमती पवार, नाशिक
(९७६३६०५६४२)

संवाद मीडिया*

🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬

*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर ‌‌चौथा प्रोजेक्ट…*

*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*‌मालवण*

https://sanwadmedia.com/133216/
https://sanwadmedia.com/131942/

*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*

*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..

*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*

*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*

*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*

*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*

*🔹बुकिंग संपर्क 🔹*

*👉‌‌रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*

*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*

*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*

*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*

*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा