You are currently viewing आनंद तरंग

आनंद तरंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी लेखक संजय धनगव्हाळ (अर्थात कुसुमताई) लिखित अप्रतिम लेख*

 

*आनंद तरंग*

*********************

माणसाचं आयुष्य म्हणजे विविध रंगांनी रंगलेले असते.माणसाने बहुरंगी असल्याशिवाय त्यांच्या आयुष्यात स्पतरंगाची उधळण होत नाही.अनेक रंग संगतीत माणूस जगत असतो वेगवेगळ्या रंगछटा माणसांच्या जीवनात रंग भरत असतात.आणि प्रत्येक रंगाचा आनंद माणूस घेत असतो.नकळतपणे माणसाच्या आयुष्यात वेगवेगळा रंग येत असतात.रंग कसाही असुदे कुठलाही असु दे त्या रंगात कुठलाही बेरंग मिसळायला नको म्हणजे झालं,नाहीतर मग आयुष्याची धुळधाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आंनदाची डोही आनंद तरंग या युक्ती प्रमाणेच माणसाने जगण्याचा आनंद घेतला पाहिजे.आपल्या अवतीभोवती विविध रंगांची माणस, अर्थात विविध स्वभावाची माणस रेंगाळत असतात कळत नसतो त्यांच्या स्वभावाचा,वागण्याचा रंग आपण पुर्ण विश्वासाने त्याला आपलस करतो आणि मग एक दिवस असं काही होत की संबधीत व्यक्त त्याचे खरे रंग दाखवायला लागतो.म्हणून कोण केव्हा कसा पाठीमागून येईल आणि बेरंगाची उधळण करेल काही सांगता येत नाही.काय असतं की सध्याच युगात पाहिले तर माणसांच्या जगण्याला एव्हढी गती आली आहे की एका जागी त्यांचे पावले थांबत नाही. सतत धावत असतात.घड्याळी प्रमाणे पळत असतात.माणसाच जगणं एव्हढ काही फास्ट झालं आहे की त्याला स्वतःला स्वतःची भ्रांत राहीली नाही.स्वत:लाच नाही तर परिवाराला देखील वेळ देता येत नाही इतका माणूस व्यस्त झाला आहे.मग याला काय म्हणावे प्रगतीच्या दिशेनं माणसाची वाटचाल की जगण्यासाठी जीवघेणी धावपळ.खर तरं माणसाने हसत खेळत रहावं, आनंदात जगावं जे काही डोळ्यांना चांगलं दिसेल ते डोळ्यात साठवून आत्मसात करावं,आपल्याला जे आवडेल ते करावं प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना आपल्याला हवं तितकं मनमुराद हसू घ्यावं कारण हास्य रंगाने माणसाच्या अंगावरची मरगळ दुर होते चेहऱ्यावरचा ताणतणाव कमी होतो आणि मग आनंदाच्या छटा चेहऱ्यावर तरंगायला लागता,मन प्रसन्न होते, मनातली उदासीनता दुर होते,माणूस ताजातवाना होतो आणि एक प्रसन्न मुद्रा माणसाला चिरतरुण ठेवते. माणसाच्या जिवनात हाश्यरंग नसते तर त्याचे जगणे अतिशय निरस राहिले असते.कारण हसणे हा दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग आहे एक क्षणभर हसु माणसाला हसत खेळतं ठेवते,हास्यनंदमुळे सकारात्मक उर्जा मिळते तर हास्य कल्लोळाने माणूस नेहमी प्रसन्न रहातो विनोदातुन मान्य निर्माण झाल्याने मेंदूची शक्ती वाढते.म्हणून माणसाने नेहमीच प्रसंन्नतेला सोबत घेऊन फिरायचे हवे.प्रसंन्नताही अशी असायला हवी की बघनाऱ्यालाही आपल्या प्रसन्नतेचा हेवा वाटला पाहिजे.कारण एक गोडं हसु किती तरी नजरेमधे बंद होत असते.आपल हसु पाहून,आपल्या चेहऱ्यावरचा आनंद, आपली प्रसन्नता पाहुन दुसऱ्याच्याही चेहऱ्यावर हसु फुलायला लागते.तेव्हा माणसाने कसलाच विचार न करत आनंदाच्या डोहात डुबकी मारून हसतखेळत रहायला हवं तरच माणूस खऱ्याअर्थाने जगू शकतो.आनंद तरंगच्या लहरी जर माणसा मधुन निघून गेल्यात तर राहत तरी काय निरागसता? नीरागसमुळे माणसाचं आयुष्य कमी होते.अस म्हणतात की आयुष्य खूप सुंदर आहे आणि अशा सुदंर आयुष्याचा आनंद ज्याने नाही घेतला तो थांबला.म्हणून माणसाने नेहमीच हसत खेळतं रहायचं मस्त जगायचं.आपल्यातला थोडा आनंद जरी दुसऱ्याला देता आला तर आपण खूप काही मिळवलं समजा.

माणूस जन्माला आल्यानंतर अनेक जबाबदारीच ओझं त्यांच्या खांद्यावर असतं आणि प्रत्येक जबाबदारी एक कर्तव्य म्हणून त्याला पुर्ण करायची असते.या दरम्यान अनेक अडचणीही येतात,नैराश्य येते काम करण्याचा उत्साह संपून जातो,अपेक्षा भंग होतात,चिंतेच्या रंगाची ढवळा ढवळ माणसांच्या आयुष्यात रंग भरत असते. पण प्रत्येक समस्येतून काहीना काही मार्गाने सापडत असतो. प्रयत्नांची वाट अवघड असली तरी आपली पावले डगमगायला नको,आपल्या पावलांवर भरवसा असला पाहिजे.भरवसा नसेल तर पावले पुढे पडणार नाही.अडचणी किती आल्या तरी ज्याला तोल सांभाळता आला त्याला पळणे अवघड नसते.अडचणींच्या फेऱ्यात अडकलेला माणूस काहीही करून आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करेल पण मागे थांबणार नाही.नैराश्याने अडचणी दुर होत नाहीत तर जबाबदारी पासुन माणसाला दुर नेण्याचा प्रयत्न होत असतो. माणसाकडे विचारशक्ती किंवा विचार करण्याची क्षमता एव्हढी दांडगी आहे की जर गांभीर्याने विचार केला तर एखाद्या अडचणीही सहज मार्ग सापडतो.त्यासाठी माणसाने प्रयत्नवादी असायला हवे.जीवनामध्ये अनेक चढ उतार येत असतात,प्रत्येक चढ उतार काही सारखे नसतात.पण केव्हा कुठे कसे वळण घ्यायचे हे ज्याला जमले त्याला कुठल्याही वाटेवर धावणे अशक्य नसते.तेव्हा अडचणी आल्या म्हणजे आयुष्य थांबत नाही.उलट जगण्याचं बळ मिळते प्रत्येक आव्हान नवीन काहीतरी शिकवत असते.त्यातून जो शिकला त्याला पुन्हा मागे वळून बघण्याची गरज पडत नाही.खरतर जखमी झाल्याशिवाय माणसाला वेदनांची तीव्रता कळत नाही.वेदनांच्या रंगावर फुंकर घालता आली पाहिजे म्हणजे त्या फुकंरीच्या गारव्याने जखम फारशी पिचडतं नाही.कारण वेदनाच वारंवार आपल्या अडचणी,समस्या, आपल्या प्रतिकुल परिस्थितीची जाणीव करून देत असते.अशाही संकटावर जो मात करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो.तोच खऱ्याअर्थाने जबाबदारीतून सहजपणे मुक्त होतो.काही माणसं खचून जातात नैराश्याने वेगळा विचार करतात पण स्वतःला संपवणे म्हणजे सर्वकाही संपले असं होतं नाही.ही पळवाट झाली.या उलट प्रतिकुल परिस्थिती माणसाला जगण्याची एक नविन संधी देत असते म्हटलं तर वेळ काळ पुन्हा काहीतरी करण्यासाठी यशाचे दार खुले करून देत असतो.ज्याने त्या यशाच्या दारातून प्रवेश करून प्रयत्नांचा शिखर पार करताना आपले ध्येय साध्या करण्यात यश मिळवले तर तो या जगाच्या पाठीवर कुठेच अपयशी ठरत नाही.अशी खूप उदाहरण देता येतील की प्रतिकूल परिस्थितीत कठोर परिश्रम करून यशस्वी झालेत आणि ते जगावर राज्य करतायं.तेव्हा घाबरायचे कशाला लढायच जो लढायला शिकला तो लढवायला ही शिकवतो आणि अशी लढवैये माणसं आयुष्यात कुठेच कमी पडत नाही.

संघर्षाच्या वाटेवर संकट येतच असतात त्यावर मात करून जे अडथळे पार करतात त्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंदाच्या रंगछटा रंगत दिसतात.अर्थात कायम हसतमुख असतात.अशी माणसं कितीही अडचणी आल्यात तरी फक्त

देवावर विश्वास ठेऊन आयुष्य जगत असतात.मगं अशा परिस्थितीत स्वतःशीच बोलत रहायचं किंवा स्वतःची समजूत काढायची की.एक दिवस माझाही असणार आहे.प्रगतीचा ध्वज फडकावयाला काही वयाची अट नसते माणूस कोणत्याही वयात यश मिळवू शकतो.तेव्हा स्वतःशीच बोलत रहायचं की होईल सर्वं काही ठिक होईल कधी कधी वाईट दिवसांत वाईट अनुभव येत असतात,अशावेळी कोणी सोबत नसतो.म्हणून चांगल्या दिवसांसाठी आपणचं आपलीच समजूत काढायची.कारण वेळ वाईट असते पण आयुष्य कधीच वाईट नसते.स्वत:खंबीर राहिलात की वाईट दिवसही निघून जातात.उगवणारा दिवस,उगवती पहाट एक नवीन संधी घेऊन येत असते.त्या संधीच सोन करण्यासाठी आपल्या मनगटात जोर असावा लागतो.आयुष्य म्हटलं म्हणजे संघर्ष असणारच आहे.अशाही संघर्षाच्या काळात चुकीचा मार्ग न निवडता जो प्रामाणिकपणे कष्ट करत रहातो त्याला देव कुठल्याही रूपात येऊन मदत करत असतो. म्हणून धिर ठेवायचा संयम बाळगायचा वाईट वेळ निघून जाते आणि केंव्हातरी चांगल्या दिवसाची सुरुवात होतेच. सुवर्ण दिवसाची वाट बघायची जो वाट बघायला शिकला तो आयुष्य जगायला शिकला समजा.जेव्हा माणूस एकटा पडतो ना तेव्हा त्यांच्या सोबत कोणीच नसतं.पडत्या काळात दुर उभे राहून गंमत बघतील पण वेदनांचे अश्रु पुसायला कोणी येत नाही अशा वेळी आपले अश्रु आपणच पुसायचे असतात. सहानुभूती ही तेव्हढ्या पुरतीच असते.पण जी व्यक्ती स्वत:चे अश्रू पुसुन पुन्हा लढायला नव्याने उभा रहातो ती व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकते.आहे त्यात समाधानी राहुन आनंदात जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यात नक्कीच सुखाचे दिवस आल्यावाचून राहत नाही.

काही माणसं कमी वेळात श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात असतात. माणसाने श्रीमंत जरूर व्हावं पण वाट चुकणार नाही याची तितकीच काळजी घेतली पाहिजे. कारण कमी वेळेत उंच भरारी घेणारे काही कमी नाहीत पण कमी वेळेत उंच भरारी घेण्याचा वेग जर कमी झाला तर उंचावरून जमीनीवर कोसळल्यानंतर त्याला उचलायला कोणीही येत नाही.तेव्हा प्रगतीच्या दिशेनं धावताना शॉर्टकट मारण्याचा आगाऊपणा कधीच करायचंय नाही. शॉट कट वाटेवर आत्मसन्मान आणि आत्मसमाधान आत्मसमाधान नसते.कारण छोट्याशा विश्वात जगणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर समाधानाचे रंग अधीकं उजळून दिसतात.म्हणून आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहून जो जगण्याचा आनंद घेतो तो जीवनात कधीच असफल होत नाही.गरिबीची झळ किंवा प्रतिकुल परिस्थितीची झळ परिस्थमाणसाला जगणं शिकवते आणि ज्याने झळ सहन केली ज्याचे जीवन उजळून निघते व त्याचा जन्म सार्थकी लागतो.आपलं आयुष्य हे स्वतःच्या मता प्रमाणे जगलं पाहिजे आपल्या जगण्याची दोरी कुणाच्या हातात देऊ नये.कारण आपण आपल्या आयुष्याचे मालक आहोत.मग आपल्यावर जर दुसरा कोणी मालकी हक्क गाजवत असेल तर अनेक अडथळे येऊ शकतात.आपल्या स्वातंत्र्यावर कोणालाही बंधनं घालण्याचा अधिकार नाही.धाक असावा,आणि असलाच पाहिजे.आपल्यावर कोणाचा धाक असेल तर पावलं चुकत नाही किंवा वेगळ्या वळणावर जात नाही.धाक माणसाला चुकीच्या कामापासून दुर ठेवत असतो.पण व्यक्ती स्वातंत्र्यावर जर कोणी हस्तक्षेप करत असेलं तर ते अयोग्य आहे.कारण आपण आपल्या अधिकाराने जगत असतो.तेव्हा कुणाला आवडो अथवा न आवडो आपण आपल्या पध्दतीने जगण्याचा आनंद घ्यायचा.कुणाला आवडत नसेल तर दुरून डोंगर साजरे करायचं आणि आपण आपल्या मार्गाने चालत रहायचं.कारण दिवस येतात जातात रोज नवरंगाची माणसं भेटतात.काही आपली होतात तर काही परकी वाटतात.कोणाला जवळ करायचं कोणाला दुर ठेवायचं हे आपणच ठरवायचं पण आपल्या आयुष्यात कळत नकळतपणे सुख दुःख समृद्धीच्या इंद्रधनुष्याची बरसात होत असते.तेव्हा आपल्या आयुष्यात येणारा आनंद तरंगचा आनंद घेण्यासाठी आपलं आयुष्य सप्तरंगी असायलाच हवं एव्हढ मात्र खरं….

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमताई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा