You are currently viewing “जय श्री राम”च्या जयघोषात सावंतवाडीत रामजन्मोत्सवाला सुरूवात…

“जय श्री राम”च्या जयघोषात सावंतवाडीत रामजन्मोत्सवाला सुरूवात…

“जय श्री राम”च्या जयघोषात सावंतवाडीत रामजन्मोत्सवाला सुरूवात…

सावंतवाडी

विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाज यांच्यावतीने आज रामनवमी उत्सवानिमित्त राम जन्मोत्सव व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले, याला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित हिंदू बांधवाकडून “जय श्री राम” अशा घोषणा देत शहरात शोभायात्रा काढण्यात आली.

येथील नारायण मंदिर पासून यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. या यात्रेत मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या तर लहान मुलांनी राम, लक्ष्मण, हनुमान व सीतेची वेशभूषा साकारली होती. डीजेच्या तालावर व नियमांचे पालन करत शहरातील मुख्य बाजारपेठेतून शिस्तबद्ध पद्धतीने ही शोभायात्रा काढण्यात आली.

यावेळी शहरात मुख्य ठिकाणांवर सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली. मात्र शिस्तबद्ध नियोजनामुळे ही यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा