You are currently viewing कवठणी येथे “भव्य खुल्या गरबा दांडिया” स्पर्धेचे आयोजन

कवठणी येथे “भव्य खुल्या गरबा दांडिया” स्पर्धेचे आयोजन

श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळ कवठणी यांच्यावतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य आयोजन

 

सावंतवाडी :

 

२८ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर या कालावधीत श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळ कवठणी यांच्यावतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य खुली गरबा दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये २०,०००/- व चषक कै. दत्ताराम ना.कवठणकर यांच्या स्मरणार्थ (बोराभाट वाडी) पुरस्कृत दत्ता कवठणकर (यद्योजक कवठणी), द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये १०,०००/- श्री. शेखर आत्माराम गावकर (माजी सरपंच कवठणी) व चषक कै. तानाजी कवठणकर यांच्या स्मरणार्थ श्री. सचिन कवठणकर पुरस्कृत, तृतीय पारितोषिक रोख रक्कम रुपये ५,०००/- श्री अक्षय द. सावंत पुरस्कृत व चषक कै. तानाजी कवठणकर यांच्या स्मरणार्थ श्री. सचिन कवठणकर पुरस्कृत तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक १५००/- व चषक श्री. ज्ञानेश्वर कवठणकर यांनी पुरस्कृत केले आहे .

पिढ्यान पिढ्या कवठणी माऊली मंदिर येथे नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यावेळी देवी समोर जागर व्हावा या उद्देशाने गावातील काही युवा मंडळींनी काही वर्षां पूर्वी दांडिया स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. त्याला २७ वर्षे पूर्ण झाल्याने हे वर्ष रौप्य मोहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असल्यामुळे भव्य खुली गरबा दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे बक्षीस वितरण ४ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ १० वाजता होणार असून सोर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन व्यवस्थापक कवठणी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क अजित कवठणकर 9404939394 / मयूर रेडकर – 8007631912 / साई कवठणकर – 8408094607 यांच्याशी साधावा. ही स्पर्धा श्री देवी माऊली मंदिर कवठणी याठिकाणी होणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =