You are currently viewing विधायक कामासाठी आम्ही एकत्र; केंद्रीय मंत्री नारायण राणे 

विधायक कामासाठी आम्ही एकत्र; केंद्रीय मंत्री नारायण राणे 

सावंतवाडी :

तब्बल पंधरा वर्षांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केसरकर यांच्या कार्यालयाला भेट दिली असून यावेळी केसरकर यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर केसरकर यांनी राणे यांना आपल्या कार्यालयात नेले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुढे पत्रकारांशी राणे यांनी संवाद साधत चांगल्या कामात केसरकर यांनी कधीही विरोधाचा झेंडा दाखविला नाही, भविष्यात आम्ही विकासासाठी एकत्र असू असा शब्द श्री राणें यांनी केसरकर यांच्या उपस्थितीत दिला. दरम्यान आमचे वैचारिक वाद होते मात्र वैयक्तिक वाद कोणतेही नसून चांगल्या कामासाठी आम्ही अनेक वेळा एकमेकांना फोन करत होतो त्यामुळे आम्ही एकत्र आलो हे म्हणणे चुकीचे, असेही राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा