You are currently viewing माणगांव येथील युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश….

माणगांव येथील युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश….

कुडाळ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हात गेल्या पाच सहा महिन्यांपासून इनकमिंग जे सुरू आहे त्याचा दिवसेंदिवस आलेख वाढता असून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात ज्या पद्धतीने संघटनात्मक काम सुरू आहे त्या संघटनात्मक कामाने प्रभावित होऊन जिल्हातील अन्य पक्षातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित होत आहेत.

आज माणगांव येथील काही युवक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत व प्रदेश संघटक सचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवक जिल्हा उपाध्यक्ष सर्व्हेश पावसकर युवक सरचिटणीस ॲड. हितेश कुडाळकर यांच्या प्रयत्नातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतीक सदस्य सावळाराम अणावकर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे,  सरचिटणीस भास्कर परब,  जिल्हा बॅन्क संचालक आत्माराम ओटवणेकर, अल्पसंख्याक प्रदेश सचिव सर्फराज नाईक,  अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीर शेख, शहर अध्यक्ष संग्राम सावंत, हमीद शेख, युवती कार्याध्यक्षा कु.संपदा तुळसकर, हितेश कुडाळकर,  सर्व्हेश पावसकर, साबा पाटकर, मिलींद घाटगे, हेमंत कांदे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमित केरकर, अमित कोरगांवकर, सुदर्शन भोगले, शञुघ्न आयरे, जनार्दन नेवगी, स्वप्निल ताम्हणेकर, राजन कदम,,  गणेश कदम,  महेश कालेलकर,  इत्यादी माणगाव बाजार येथील युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचा पक्ष संघटनेत योग्य तो सन्मान राखला जाईल. तसेच या युवकांनी माणगांव खोर्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करावेत.  पक्ष नेहमी तुमच्या सोबत आहे,  असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 2 =