You are currently viewing संकलन शिक्षकासाठी’ हा संग्रह म्हणजे शिक्षण क्षेत्रातील सर्वांसाठी एक मार्गदर्शकच ठरेल – :आमदार कपिल पाटील

संकलन शिक्षकासाठी’ हा संग्रह म्हणजे शिक्षण क्षेत्रातील सर्वांसाठी एक मार्गदर्शकच ठरेल – :आमदार कपिल पाटील

धनाजी पाटील लिखित माहिती पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन..

तळेरे: प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील कार्यरत असलेले संस्थाचालक, मुख्याध्यापक,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि शिक्षक चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल असा अत्यंत उपयुक्त संग्रह शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष धनाजी पाटील यांनी तयार केला आहे. असे उदगार शिक्षक भारतीचे संस्थापक व शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी काढले.

धनाजी पाटील यांनी दीर्घकाळ काम करून शिक्षण क्षेत्राशी निगडित कायदे,शासन निर्णय व निवडक न्यायालयाने निकाल इ संग्रहित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील शिक्षक भारतीच्या कार्यालयात नुकतेच संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे होते.
यावेळी प्रथम शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केल्यानंतर *संकलन शिक्षकासाठी* या संग्रहाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


या पुस्तक प्रकाशनानंतर धनाजी पाटील यांनी उपस्थितांना या पुस्तकाबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार या पुस्तकांमध्ये महाराष्ट्र खाजगी शाळातील सेवेच्या शर्ती अधिनियम 1977, महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981, सध्या 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या राष्ट्रीय पेन्शन योजना व शालेय शिक्षण कामकाज सांभाळण्यासाठी निर्गमित झालेले विविध महत्वाचे शासन निर्णय आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सुमारे 150 हून अधिक निवडक निकालांचं संक्षिप्त स्वरूप या पुस्तकातून संग्रहित करण्यात आले आहे.
हे पुस्तक संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर या सर्वच कर्मचाऱ्यांना अत्यंत मार्गदर्शक ठरेल असा विश्वास यावेळी धनाजी पाटील यांनी व्यक्त केला.
यानंतर समारंभासाठी प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी या संग्रह पुस्तकाचे स्वरूप पाहता, ते शिक्षकांना एक जवळचा मार्गदर्शक म्हणून ते भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला. धनाजी पाटील यांनी केलेल्या या संग्रहासाठी बराच काळ घालविला आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी पुस्तकातून केलेली विषयवार मांडणी याचा मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री वाटते असे गौरवोद्गार काढले. धनाजी पाटील यांच्या सारखे अभ्यासू व तळमळीने काम करणारे कार्यकर्ते शिक्षक चळवळीमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहेत. सदरचा संग्रह शिक्षकांच्या समस्यांना मार्गदर्शक ठरू शकतील याची मला खात्री वाटते असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित असलेले मुंबईतील जेष्ठ समाजसेवक श्रीपाद हळबे यांनी या पुस्तकाचे स्वरूप पाहिल्यानंतर धनाजी पाटील यांनी बराच काळ याबाबत कष्ट केले असतील यामध्ये तीळमात्रमात्र शंका नाही. कारण न्यायालयाने दिलेले निकाल संक्षिप्त स्वरूपात मांडून ते वाचकापर्यंत पोहोचविणे हे अत्यंत कष्टाचे काम आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे धनाजी पाटील यांनी या पुस्तकात न्यायालयीन निकाल संग्रहित केले आणि त्याचबरोबर त्यांनी ऑनलाईन व इतर माध्यमातून उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे सुमारे 1200 हुन आधी निकाल पत्र संकलित केले.हे काम अत्यंत कष्टाचे जिकिरीचे आणि वेळ खाऊ आहे. त्यामुळे त्यांनी कष्टाने तयार केलेला संग्रह शिक्षकांसाठी आणि आम्हा सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल याची मला आनंद आहे असे सांगून या संग्रहाबद्दल धनाजी पाटील यांचे कौतुक केले.
राज्याचे अध्यक्ष बेलसरे सर यांनी गेल्या अनेक वर्षापासून धनाजी पाटील यांचा सुरू असलेला प्रयत्न हा आज दृश्य स्वरूपात प्रकाशन होऊन समोर येत आहे याचा आनंद आहे. चळवळीमध्ये अशाच कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. हे पुस्तक सर्वांना मार्गदर्शक ठरेल याचा विश्वास वाटतो असे उदगार काढून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर राज्य कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची समाप्ती झाली.
या कार्यक्रमासाठी शिक्षक भारतीच्या राज्य महिला आघाडीच्या अध्यक्ष श्रीमती संगीताताई पाटील, शिक्षक भारतीच्या ज्युनिअर कॉलेज विभागाचे राज्य अध्यक्ष आर बी पाटील, राज्य उपाध्यक्ष हिराजी पाटील, मुंबई विभागाच्या अध्यक्ष श्रीमती कल्पनाताई शेंडे, तलासरी येथील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजपूत, मुख्याध्यापक प्रकाश पाटील नवी मुंबई, शिक्षक भारती रत्नागिरीचे जिल्हा कार्यवाह व पतपेढीचे माजी चेअरमन निलेश कुंभार, रत्नागिरी जिल्हा सहकार्यवाह संजय पाथरे, संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते व माजी मुख्याध्यापक सिद्धेश्वर जाधव यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 6 =