You are currently viewing निवडणुकीचे गांभीर्य बाळगून कामाला लागा – केंद्रीय मंत्री नारायण राणे 

निवडणुकीचे गांभीर्य बाळगून कामाला लागा – केंद्रीय मंत्री नारायण राणे 

निवडणुकीचे गांभीर्य बाळगून कामाला लागा – केंद्रीय मंत्री नारायण राणे

पडवे उपसरपंचा सह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ओरोस

देशामध्ये ४४ वर्षानंतर प्रथमच कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढली जाणार आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे, कार्यकर्त्यांनी या निवडणुकीचे गांभीर्य बाळगून कामाला लागावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ओरोस येथील भाजप कार्यकर्ता संवाद मिळाव्यात केले.

देश महासत्ता बनण्यासाठी वेग वाढविण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे, त्यामुळे सर्वांनी कामाला लागावे असे त्यांनी सांगितले. यावेळी पडवे गावच्या उपसरपंच रूनाली परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री राणे यांनी त्यांचे स्वागत केले. ओरोस फाटा येथील श्री ईच्छापूर्ती मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या ओरोस जिल्हा परिषद मतदारसंघ कार्यकर्ता संवाद सभेला भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संदीप कुडतरकर, महिला प्रदेश सदस्य संध्या तेरसे, राजू राऊळ, महिला अध्यक्षा सुप्रिया वालावलकर, राजू राऊळ, ओरोस बुद्रुक सरपंच आशा मुरमुरे, कसाल सरपंच राजन परब, रानबांबुळी परशुराम परब यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा