वेंगुर्ला :
मराठी नविन वर्षाला दरवर्षी गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत असतो. या नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेंगुर्ला येथील हिदू धर्माभिमानीच्यावतीने मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी भव्य स्वागतयात्रा आयोजित केली आहे. ही स्वागतयात्रा सायं. ५ वा. रामेश्वर मंदिर येथून सुरू होऊन शिरोडा नाका, दाभोली नाका, बाजारपेठ, गाडीअड्डा, मारुती मंदिरमार्गे पुन्हा रामेश्वर मंदिर त्याची सांगता होणार आहे.
दरम्यान, स्वागतयात्रेपूर्वी रामेश्वर मंदिरात दुपारी ३.३० ते ४.३० पर्यंत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा बाल, प्राथमिक व माध्यमिक अशा स्तरावर घेण्यात येणार असून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत. पारितोषिक वितरण समारंभ स्वागत यात्रा संपल्यानंतर रामेश्वर मंदिर येथेच घेण्यात येईल. स्पर्धकांनी आपले नावे भाऊ केरकर (८८०५१०५९५४) किवा अजित राऊळ (९०२११७०१४६) यांच्याकडे नोंदवावीत.