You are currently viewing मालवणचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे देवगड नगरपंचायतचा अतिरिक्त कार्यभार

मालवणचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे देवगड नगरपंचायतचा अतिरिक्त कार्यभार

देवगड :

 

देवगड जामसंडे नगरपंचायतीचे मुख्यअधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांची बदली झाल्याने देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार मालवण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.

देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी म्हणून कौस्तुभ गव्हाणे हे कार्यरत होते. शासन आदेशान्वये कौस्तुभ गव्हाणे यांची प्रशासकीय कारणास्तव मुख्याधिकारी श्रीपूर महाकुंग नगरपंचायत (जि.सोलापूर) या ठिकाणी बदली झाली.

त्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार संतोष जिरगे मुख्याधिकारी, मालवण नगरपरिषद यांचेकडे सुपूर्द देण्यात आला आहे.

संतोष जिरगे यांनी यापूर्वी जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून देखील जिल्ह्यात काम केले आहे. तसेच त्यांना नगरपालिका प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. गेली सहा वर्षे ते नगरपालिका प्रशासनात विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे श्री जिरगे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + twelve =