You are currently viewing बोरीवली येथील अटल स्मृती उद्यानाला भेट

बोरीवली येथील अटल स्मृती उद्यानाला भेट

राज्यपालांचे अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन

मुंबई

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे जाऊन वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. अटल स्मृती उद्यान परिसराला भेट देऊन राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.

            यावेळी खासदार गोपाल शेट्टी, लदाखचे खासदार जाम्यांग छेरिंग नामग्याल, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार सुनील राणे, भाई गिरकर, योगेश सागर व मनिषा चौधरी तसेच नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

            येथील वाजपेयी यांच्या जीवनावरील दृकश्राव्य प्रदर्शनाची पाहणी श्री. कोश्यारी यांनी केली . तेथे निर्माण केलेली संसद भवनाची प्रतिकृतीही राज्यपालांनी पहिली तसेच वाजपेयी यांच्या जीवनावरील आभासी प्रश्नमंजुषेत सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − sixteen =