You are currently viewing भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
Oplus_16908288

भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शुभेच्छांचा वर्षाव

सावंतवाडी :

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा तळवडे जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजप युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विविध लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून संदीप गावडे यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भाजप नेते विनोद राऊळ, कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकेल डिसोझा, नितीन राऊळ, वेंगुर्ला भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, कळंबिस्त पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, दोडामार्गचे माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, सावंतवाडी मंडल युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, आंबोली मंडल युवामोर्चा अध्यक्ष विनेश तावडे, वेंगुर्ला नगरसेवक तथा सभापती सचिन शेटये, सावंतवाडीचे माजी नगरसेवक राजू बेग, कास सरपंच प्रवीण पंडित तसेच मळगावचे माजी सरपंच निलेश कुडव यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिरीष नाईक, सावंतवाडी मंडल चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, संतोष बिले, पुंडलिक कदम, सायमन आल्मेडा, समीर कुडाळकर, विजय रेडकर, योगेश नाईक, हेमंत गावडे, प्रशांत नाईक, मारुती दोडशानटी यांच्यासह अन्य अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा