You are currently viewing शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे कसले लक्षण म्हणायचे?

शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे कसले लक्षण म्हणायचे?

शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकार आणि हरयाणातील खट्टर सरकारवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केल्यावरून ‘नेम’ धरला आहे. ‘आंदोलक शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसते,’ असा रोखठोक सवाल शिवसेनेने केला आहे.

 

विविध राज्यांतील शेतकरी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत ठिय्या मांडून आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रासह विविध राज्यांतून पाठिंबा मिळत आहे. विविध राजकीय पक्ष, संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा ताफा अडवून घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यानंतर १३ शेतकऱ्यांवर राज्यातील भाजप सरकारने गुन्हे दाखल केले.

 

‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने केंद्र सरकार आणि हरयाणाच्या भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘खट्टर सरकारने सूडाने जी कारवाई केली आहे, ती संतापजनक आहे. शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे कसले लक्षण म्हणायचे? लोकप्रियता घटल्यानंतर उतरती कळा लागून ऱ्हासाच्या दिशेने सुरू झालेला हा प्रवास आहे,’ असे म्हणावे लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + nineteen =