संवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा
You are currently viewing युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते रंगिला चषक २०२४ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते रंगिला चषक २०२४ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

 

सावंतवाडी  :

 

युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते मयुर लाखे मित्र मंडळ आयोजित रंगिला चषक २०२४ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे क्रिकेट खेळाडू स्पर्धकांना शुभेच्छा देत त्यांनी सन्मानाचा स्वीकार केला.

“पायाभूत सुविधांसह जनकल्याणाच्या दृष्टीने विविध समस्या आणि अडचणी आपल्यासमोर आहेत. आचारसंहिता असल्याकारणाने मी त्या तात्काळ सोडवू शकत नाही. परंतु या पुढील काळात मी नक्कीच त्या सोडवण्यावर भर देईल. आपण देखील त्याचा पाठपुरावा माझ्याकडे करा, असे विशाल परब यांनी हक्काने उपस्थित लाखे वस्तीतील जेष्ठ नागरिकांसह युवा कार्यकर्त्यांना आवाहन केले.

या कार्यक्रम प्रसंगी परिसरातील जेष्ठ नागरिक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रिकेट खेळाडू उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा