You are currently viewing “कणकवली विधानसभेत घर तिथे युवासैनिक अभियान राबवणार”

“कणकवली विधानसभेत घर तिथे युवासैनिक अभियान राबवणार”

– नुतन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा संकल्प

सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री.सुशांत श्रीधर नाईक यांचा युवासेना कणकवली तालुक्याच्या वतीने आज विजय भवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कणकवली तालुका युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नूतन युवासेना जिल्हाप्रमुख श्री.सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत बैठक देखील संपन्न झाली.
”कणकवली विधानसभा मतदार संघ युवासेनेची मला वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून युवासेना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. युवकांच्या ज्या काही समस्या असतील त्या शिवसेनेच्या माध्यमातून प्राधान्याने सोडवल्या जातील. तसेच ‘घर तिथे युवासैनिक’ हे अभियान देखील राबवण्यात येणार आहे,” असे श्री.सुशांत नाईक यांनी उपस्थित युवासैनिकांना सांगितले. या बैठकीत सुशांत नाईक यांनी कणकवली तालुका युवासेना संघटनेचा आढावा घेतला. यावेळी कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद निहाय युवासेनेच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले. यावेळी श्री.नाईक यांनी युवासेनेची कणकवली तालुक्यातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याच्या सूचना उपस्थित पदाधिकाऱ्यांना करून बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.
यावेळी युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, युवासेना जिल्हा समन्वयक गितेश कडू , युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, गुरु पेडणेकर, धनंजय सावंत, सचिन पवार, नासिर खान, प्रकाश वाघेरकर, सुशांत मोहिते, प्रकाश मेस्र्ती, तेजस राणे, प्रतीक रासम, अमित मयेकर, रोहित राणे, भाई साटम , किरण वर्दम, निलेश परब, वैभव मालंडकर, भूषण कोळसुलकर, तेजस राऊत, केतन सावंत, चैतन्य सावंत,बंटी उरणकर,प्रमोद पिळणकर, कैलास घाडीगावकर, महेश राणे, सूर्यकांत घाडीगांवकर, शरद सरंगले, संतोष सावंत, पराग म्हापसेकर, ओमकार सावंत, श्रीकृष्ण घाडीगावकर, कुणाल राणे, रोहित आरुंदेकर, अनादि साईल आदी युवासैनिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =