You are currently viewing ” लाभले भाग्य मला”

” लाभले भाग्य मला”

” लाभले भाग्य मला”
…अँड.नकुल पार्सॅकर…
आजकाल वाकून नमस्कार करावा असे पाय शोधावे लागतात..पण अशी दुर्मिळ माणसे जेव्हा भेटतात तेव्हा खरोखरच एक आत्मिक समाधान आणि सकारात्मक उर्जा प्राप्त होते.
मा.प्रमोद कामत हे ज्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यादिवशी सगळ्यात जास्त आनंद मला झाला.भाजपाच्या पक्षनेतृत्वाने खरोखरच अतिशय चांगला निर्णय घेतला.खरे तर राज्यमंञ्याचा दर्जा आणि अधिकार असलेले पद.पण हे पद ग्रहण केल्यावरही कामत यांच्या बोलण्यात,वागण्यात तसूभरही बदल झाला नाही.तोच साधेपणा आणि सगळ्यानां सोबत घेऊन मार्गक्रमण करण्याची तीच कार्यपद्धती.नाहीतर एखाद्या वॉर्डातून निवडणून आलेल्या नसलेली छाती पुढे काढून चालणाऱ्या साध्या नगरसेवकालाही आपण अनेकदा अनुभवतो.
ज्या डिंगणे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यानी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली त्या गावात आणि इतर पंचक्रोशीत सर्व पक्षीय संबध आणि सौहार्दपूर्ण वातावरण ठेवल्याने समाजातील सर्वच घटक कामत यांच्याशी अतिशय आदराने आणि प्रेमाने वागतात.कुणीही गरजवंत त्यांच्याकडे गेला तर कधीच रिकामी हाताने परत येत नाही.जसे ते सगळ्यांशी अतिशय नम्रतेने वागतात तसेच त्यांचा व्यवहारही अतिशय पारदर्शक आहे.अशा समाजाभिमुख, विनयशील कामत सरांचा सत्कार माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांच्या हस्ते झाला.निमित्त होते मळेवाड ग्रामपंचायत व मळेवाड सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आमचे परममित्र आणि ग्रामविकासाचा ध्यास घेऊन काम करणारे श्री हेमंत मराठे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या पाच दिवशीय भव्य अशा महोत्सवाच्या सांगता समारंभांचा. या समारंभाला सावंतवाडीच्या नगराध्यक्षा मा.श्रध्दाराजे भोसले,मा.युवराज लखमराजे आदी मान्यवर उपस्थित होते.मा.प्रमोद कामता सारख्या सेवाभावी,सच्चा कार्यकर्त्यांचा सन्मान केल्याचे भाग्य मला लाभले.धन्यवाद मळेवाड ग्रामपंचायत व श्री हेमंत मराठे.

प्रतिक्रिया व्यक्त करा