You are currently viewing शासनाने गस्तीनौका उपलब्ध करून न दिल्यास शासनाच्या नावाने पारंपारिक मच्छिमार पिंडदान करतील – बाबी जोगी

शासनाने गस्तीनौका उपलब्ध करून न दिल्यास शासनाच्या नावाने पारंपारिक मच्छिमार पिंडदान करतील – बाबी जोगी

शासनाने गस्तीनौका उपलब्ध करून न दिल्यास शासनाच्या नावाने पारंपारिक मच्छिमार पिंडदान करतील – बाबी जोगी

मालवण

पावसाळ्याच्या बंदी कालावधी नंतर मत्स्य हंगाम सुरु झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच समुद्रात बांगडा मोठ्या प्रमाणात मिळू लागला असून हा मासा लुटण्यासाठी मालवण किनारपट्टी नजिकच्या समुद्रात पर्ससीन नौकांची घुसखोरी सुरु झाली आहे. मात्र त्यांना रोखण्यासाठी अद्यापही शासनाने गस्तीनौका उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे धनदांडग्या पर्ससीन धारकांना शासनाने समुद्र आंदण दिलाय का? असा प्रश्न मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी उपस्थित करत याबाबत तातडीने शासनाने गस्तीनौका उपलब्ध करून न दिल्यास येत्या पितृपक्षात शासनाच्या नावाने पारंपरिक मच्छिमार पिंडदान करतील, असा इशाराही दिला आहे.

मासेमारी हंगाम नव्याने सुरु झाला आहे. मात्र शासनाने मच्छीमारांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. समुद्रकिनारी पर्ससीन नौकांमार्फत मच्छीमारीची लूट सुरु आहे. शासनाचे कायदे धाब्यावर बसून ही मासेमारी सुरु असून सिंधुदुर्ग फिशरीजला देण्यात येणारी गस्तीनौका अद्याप देण्यात आली नाही. त्यामुळे हे सरकार गरीब व पारंपारिक मच्छीमार यांची रोजीरोटी वाचवू शकत नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात संघर्ष छेडण्याचा निर्णय पारंपरिक मच्छिमारांनी घेतला आहे, असेही बाबी जोगी यांनी म्हटले आहे.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा