वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

रायगड जिल्ह्यात कुडपान येथे वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत चौघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. सुमारे तीनशे फूट खोल दरीत हा ट्रक कोसळला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलादपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घटनास्थळाकडे पोलादपूर पोलिस आणि ट्रेकर्स पोहोचले आहेत.

लग्न आटोपून हा वऱ्हाडींनी भरलेला ट्रक निघाला होता. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक कुडपान नजीक दरीत कोसळली. आतापर्यंत चौघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. सुमारे तीनशे फूट खोल दरीत ट्रक कोसळला आहे. घटनास्थळाकडे पोलादपूर पोलिस आणि ट्रेकर्स रवाना झाले आहेत. काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे. अंधार पडत चालल्याने आणि पावसामुळे आता रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी येत असल्याची माहिती आहे.

अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याच गाडीत नवरा नवरी देखील होते. ते सुखरुप असल्याची माहिती आहे. या गाडीमध्ये जवळपास 40 लोक होते, त्यातील चौघांचा मृत्यू झाला तर चार जण जास्त गंभीर जखमी आहेत तर तीस जण जखमी आहेत.

रत्नागिरीहून रायगडकडे हा ट्रक चालला होता. घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा