You are currently viewing कुडाळ येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन

कुडाळ येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन

कुडाळ येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन

  • जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते उद्घाटन
  • २९ आणि ३० मार्च रोजी आयोजन
  • ग्रंथ प्रदर्शन व विक्री

सिंधुदुर्गनगरी

 ग्रामीण व शहरी भागातील लोकांमधील वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने दरवर्षी जिल्हा अथवा तालुका स्तरावर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव २०२३’ चे आयोजन  दि. २९ ते ३० मार्च २०२४ रोजी कुडाळ येथील रा.ब.अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय, पानबाजार येथे करण्यात आलेले आहे. शुक्रवार दि. २९ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते  ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुंबई विभागाच्या प्रभारी सहायक ग्रंथालय संचालक मंजुषा साळवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी, साहित्यिक अनंत वैद्य, कुडाळचे को.म.सा.प.चे अध्यक्ष मंगेश मसके, कुडाळ चे रा.ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहायल (जिल्हा ग्रंथालय) अध्यक्ष अरविंद शिरसाट आदी उपस्थिती असणार आहेत. ग्रंथोत्सव काळात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून अनेक ग्रंथ विक्रीसाठी देखील उपलब्ध असणार आहेत.

कार्यक्रमाची रूपरेषा

दुपारी १२ वा:  व्याख्यान

विषय –  छत्रपती शिवाजी महाराज व सिंधुदुर्ग

सहभाग- काशीनाथ आ. सामंत, अँङ महेश कुंटे,

दुपारी ३ वाजता “गर्जा महाराष्ट्र माझा ”

सादरकर्ते :श्री सदगुरु संगीत विद्यालय सावंतवाडी.

शनिवार दि.३० मार्च २०२४, सकाळी ११ वा:   ‘बालवाचक व वाचनसंस्कृती’  ‘मी सावित्री बोलतेय’

सहभाग:, कु.आर्या किशोर कदम, बाल परिसंवाद- सहभाग  कोलगाव केंद्र शाळेतील निवडक विद्यार्थी, अन्वी अजित देसाई, अक्षरा अनिल राऊळ, धनश्री मिलिंद निकम, साध्वी अनंत मिंडे.

दुपारी ३ वा कथाकथन

सहभाग-  सुरेश ठाकुर, वृंदा कांबळी, हेमंत पाटकर, विभूती ठाकूर, संजय आ. राऊत, विठ्ठल कदम, समारोप समारंभ ४ :३० वाजता डॉ. विवेक पाटणकर, रमेश बोंद्रे, धाकू तानावडे, महेश बोवलेकर, भरत गावडे. सौ प्रतिभा पाटणकर, सुरेंद्र सकपाळ ,रश्मी कांदळगावकर, कार्यक्रमाचे स्थळ अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथ संग्रहालय जिल्हा ग्रंथालय कुडाळ.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − one =