You are currently viewing ठाण्यातील शारदा विद्या मंदिरात गुरुवारी रुपेश पवार यांचे व्याख्यान

ठाण्यातील शारदा विद्या मंदिरात गुरुवारी रुपेश पवार यांचे व्याख्यान

ठाणे :

ठाण्यातील तीन पेट्रोल पंप येथे असणाऱ्या शारदा विद्या मंदिर निवासी शाळेत चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि झेप युट्युब चॅनेल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार २८ मार्च २०२४ रोजी तिथीनुसार शिवजयंतीचे आयोजन केले आहे. यावेळी चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार, साहित्यिक एडवोकेट रुपेश पवार हे शिवाजी महाराजांवर व्याख्यान देणार आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. “छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून” या शिवजयंती सोहळ्यात रुपेश पवार आपल्या अंतरंग काव्यसंग्रहाच्या प्रति सर्व विद्यार्थ्यांना भेट म्हणून देणार आहेत. हा कार्यक्रम शारदा विद्या मंदिर शाळेत गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे.

या शिवजयंती समारंभाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ उद्योजक श्री नारायण पहलजराय चांग हे आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन पत्रकार राजेंद्र गोसावी यांनी केले असून. विशेष सहाय्य शालेय समिती निमंत्रक सदस्य बाळकृष्ण म्हसकर व संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ. एम व्ही जाधव यांनी केले आहे. झेप या चॅनेलचे संचालक विनोद धांडे हे या शिवजयंती व्याख्यानाला चॅनलच्या माध्यमातून शिवभक्तांपर्यंत पोहोचवणार आहेत. या निवासी शाळेतल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी विनोद धांडे आवाहन करणार आहेत. दानशूर व्यक्तींनी जरूर या विद्यार्थ्यांना मदत करावी. त्याकरता संस्थेशी ९९२०७२४६२७  शारदा विद्या मंदिर येेेेथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + twelve =