You are currently viewing सांगवे, शिवडाव पंचक्रोशीत बिबट्याचा वावर

सांगवे, शिवडाव पंचक्रोशीत बिबट्याचा वावर

सांगवे, शिवडाव पंचक्रोशीत बिबट्याचा वावर,

नागरिकांकडून बंदोबस्ताची मागणी…

कणकवली

तालुक्यातील सांगवे-पामतेल परिसरात प्रवास करणाऱ्या एका युवकाला रात्री साडे आठच्या सुमारास रस्त्यावर बिबट्या दिसून आला. तालुक्यातील कनेडी, शिवडाव, कळसुली, शिरवल, दारिस्ते, हळवल या परिसरात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

यापूर्वी भिरवंडे आणि सांगवे परिसरात नागरिकांना बिबट्या दिसून आला होता. आता सांगवे शिवडाव मार्गावर प्रवास करणाऱ्यांना बिबट्या दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिसरात वावर असणाऱ्या बिबट्याला पकडून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात यावे अशी मागणी इथल्या नागरिकांतून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − eight =