आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश.
वैभववाडी
तरेळे – गगनबावडा रस्ता नूतनीकरण कामाला सुरुवात झाल्याने वाहन चालक व प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आमदार नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे लवकरच हा महामार्ग वाहतुकीला निर्धोक होणार आहे.
तरेळे – वैभववाडी व वैभववाडी ते गगनबावडा या प्रमुख महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता दुरावस्थेमुळे या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तालुका विकास कामांचा आढावा बैठक पार पडली. रस्ता दुरावस्थेवरून सा. बां. चे कार्यकारी अभियंता यांना आमदार नितेश राणे यांनी खडेबोल सुनावले होते. रस्ता निर्धोक न झाल्यास गाठ नितेश राणेशी असा धमकी वजा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला होता. वैभववाडी भाजपने रस्ता दुरावस्थेबाबत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले होते. आमदार नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या रस्ता कामाला सुरुवात झाली आहे. तरेळे येथून रस्ता डांबरीकरण काम सुरु झाले आहे. या कामाला सुरुवात झाल्याने वाहन चालकांचा जीव भांड्यात पडला आहे. आ. नितेश राणे यांचे वाहनचालक व वैभववाडीवासींकडून आभार मानले जात आहेत.