You are currently viewing झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे दोन कार मध्ये भीषण अपघात

झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे दोन कार मध्ये भीषण अपघात

दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सावंतवाडी

झाराप पत्रादेवी मळगाव हायवे येथे दोन-चार चाकी गाड्यांमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या अपघाताबाबतची अधिक माहिती अशी की, बांदा येथील पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के हे आपल्या ताब्यातील कारने कुडाळच्या दिशेने जात असताना कुडाळ वरून गोव्याच्या दिशेने जाणारी कार दुभाजकाच्या पलीकडे येऊन त्यांच्या कारवर धडकल्याने झालेल्या अपघातात सोनटक्के यांच्यासह समोरील गाडीतील प्रवासीही जखमी झाले. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकरवाडीलगत हा अपघात घडला. या अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. यावेळी सावंतवाडीचे माजी सभापती राजू परब, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी, संजय जोशी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा