You are currently viewing विमानतळाला नको,.. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला बाळासाहेब यांचे नाव द्या

विमानतळाला नको,.. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला बाळासाहेब यांचे नाव द्या

मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मागणी

कणकवली : ​
कोकणावर प्रेम करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मुंबई गोवा महामार्गाला द्या, ठाकरेंबद्दल राणेंना बोलण्याचा अधिकार नाही.
अख्या जगावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट नाव कोरले आहे.​ ​त्यांचे नाव खासगी विमानतळ प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाला देऊ नये.​ ​मुबंई​ ​​-​ गोवा ​राष्ट्रीय महामार्ग होत आहे,​ ​त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे,​ ​ही मागणी मनसेची आहे.​ ​मी आजही बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे.​ ​आता हे उपरे सत्ताधारी व विरोधक विमानतळ नामांतर श्रेयवाद करत असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.
कणकवली मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहे.​ ​यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश नेरकर आदी उपस्थित होते.
राणे व त्यांच्या पुत्रांनी ​बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ​​सातत्याने टीका ​​केली.​ ​शिवसेना संपविण्याची भाषा केली.​ ​त्यावेळी जिल्ह्यात आम्ही राणेंशी लढलो, आम्ही राहिलो नसतो तर आताची शिवसेना राहिली नसती.​ ​आता पुतण्या मावशीच्या प्रेमाप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आग्रह करत आहे.​ ​बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठी भाषा केली.​ ​काही वक्तव्य केल्याने त्याची माफी राणेंना मागावी लागली.​ ​राणे कुटुंबातील लोकांना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलायचा अधिकार नसल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी व विधानसभेतीळ विरोधी पक्ष नामांतर वरून श्रेयवाद करत आहे.​ ​हे विमानतळ किती दिवस चालेल? त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणं किती योग्य आहे?​ ​लातूर,​ ​नाशिक, कोल्हापूर ही ​ विमानतळे ​बंद पडली आहेत.​ ​बाळासाहेब ठाकरे ​हे ​जनसामान्यांसाठी ​जे ​बोलत ते करत होते.​ ​त्यामुळे मुबंई पुणे ​ह्या ​रस्त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले पाहिजे,​ ​अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली​ आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + four =