You are currently viewing शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप..

शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप..

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य..

 

कणकवली :

 

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते भाजपचे आम. नितेश राणे यांनी जाहीर केलेल्या गरजू शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटपाच्या उपक्रमाचा शुभारंभ कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी करण्यात आला. शुभारंभाला ११० शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. आम. नितेश राणे यांच्या या उपक्रमाचा कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील शाळकरी गरजू मुलींना लाभ होणार आहे. त्याची सुरुवात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ३८० सायकल मतदार संघात दिल्या जाणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलींसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.

११० शाळकरी मुलींना सायकल वाटप करणार आल्या. यावेळी आम. नितेश राणे यांच्या सोबत सौ. नीलम राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत, समीर नलावडे, संजना सावंत, मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, हर्षदा वाळके, प्रज्ञा ढवण, डॉ.अमोल तेली, संदीप मेस्त्री यांच्या सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

शाळेचे अंतर घरापासून लांब असल्याने आणि वाहतुकीची गैरसोय असल्याने अनेक शाळकरी मुलींच्या शिक्षणात खंड पडतो. कित्येकदा शाळेत आणि शाळा सुटल्यावर घरी वेळेवर पोचता येत नाही. आता स्वतःच्या हातात सायकल असल्यामुळे या शाळकरी मुलीं ची वाहतुकीची गैरसोय दूर होणार असून त्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी याचा फायदा होणार आहे. मोफत सायकल चा लाभ मिळणाऱ्या शाळकरी मुली आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आमदार नितेश राणेंच्या या सामाजिक उपक्रमा बद्दल आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा