*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि.देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
जंगलात ट्राफिक जाम झाली..
————————————————-
शहरी रस्त्यावर होते तशीच
जंगलात घडली गोष्ट अशीच
एकाच वेळी सर्वांना घाई झाली
त्यात बघा ही ट्राफिक जाम झाली ।
उंदीरमामा ,ससेभाऊ ,अस्वल् दादा
हत्तिभाऊ, मनीमाऊ ,माकड दादा
होते निघाले सारे आफिसला
बघती काय ट्राफिक जाम झाली ।
शाळेच्या रिक्षा ,अन गाड्या सगळ्या
अडकून पडल्या जागच्या जागी
मुलं-मुली लागली म्हणू- अरे देवा ,
काय करावे ट्राफिक जाम झाली ।
जिराफ हवालदार खूप रागावले
शिट्टी वाजवीत जोरात म्हणाले
शिस्त पाळत नाहीत ,बेशिस्त सारे
तुमच्यामुळेच ही ट्राफिक जाम झाली ।
————————————————–
बालकविता – जंगलात ट्राफिक जाम झाली ।
-अरुण वि..देशपांडे -पुणे.
————————————————————————–