You are currently viewing वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी (NEET) नीट परीक्षा देणे गरजेचे: बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने केले विद्यार्थ्यांना आवाहन..

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी (NEET) नीट परीक्षा देणे गरजेचे: बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने केले विद्यार्थ्यांना आवाहन..

कुडाळ :

बारावी विज्ञान शाखेचे मधून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषय घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर (NEET) नीट परीक्षा देणे गरजेचे असते. “नीट” परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय अभ्यासक्रमातील (MBBS, BDS, BUMS, BAMS, BHMS, BPTH,(phy siotherapy), B SC NURSING, BOTH, BASLP, BP&O) अशा विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याखेरीज या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळत नाही हे बऱ्याच विद्यार्थ्यांना व पालकांना माहीत नसल्यामुळे ते या अभ्यासक्रमात मध्ये प्रवेश घेण्यापासून वंचित रहातात. ही बाब बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, फिजिओथेरपी महाविद्यालय चे प्राचार्य, प्राध्यापक यांच्या लक्षात आल्याने कुणीही विद्यार्थी इच्छा असूनही माहिती अभावी वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून त्यानी NEET परीक्षेबाबत जागृती करण्याचे हे प्रयत्न चालविले असून विविध कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक, प्राचार्यांशी संपर्क साधून ते माहिती देत आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. नीट परीक्षांचे अर्ज www.nta.ac.in तसेच neet.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरणे गरजेचे आहे. सदर फॉर्म ६ एप्रिल ते ६ मे २०२२ पर्यंत भरणे आवश्यक आहे. आणि *सदर परीक्षा १७ जुलै २०२२* रोजी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी नीट परीक्षांचे फॉर्म भरून प्रवेश परीक्षा देऊन वैद्यकीय अभ्यासक्रमातील आपला प्रवेश निश्चित करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने प्राप्त झाली आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन बॅ नाथ पै शिक्षण संस्थेने केले आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. विद्यार्थी, पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − nine =