You are currently viewing वरळीमधील ‘मनिष कमर्शियल सेंटर’ इमारतीमध्ये स्पोट

वरळीमधील ‘मनिष कमर्शियल सेंटर’ इमारतीमध्ये स्पोट

मुंबई :

मुंबईत वरळीयेथील सेंचुरी बाजार मधील ‘मनिष कमर्शियल सेंटर’ या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आज सकाळी पावणे नऊ च्या सुमारास केमिकल लॅबमध्ये स्फोट झाला. या स्फोटाचं स्वरूप इतकं गंभीर होतं की दोन किलोमीटरपर्यंत या स्फोटाची तीव्रता जाणवली. समोरच्या इमारतीतही या स्फोटाचा आघात दिसून आला.

नायट्रोजन सिलिंडरचा हा स्फोट होता, अशी माहिती मिळत आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की इमारतीचा काही भाग कोसळला. रस्त्यावर बिल्डिंगच्या काचा फुटून विखुरल्या होत्या. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू आहे. यात एक ३० वर्षीय महिला जखमी झाली आहे. तिच्या पायाला आणि डोक्याला किरकोळ जखम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस या घटनेची चौकशी करुन असून स्थानिक आमदार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील घटनास्थळी येणार असल्याची माहिती आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eleven =