You are currently viewing NIMP प्रकल्प आडाळी ता.दोडामार्ग येथेच होणार…

NIMP प्रकल्प आडाळी ता.दोडामार्ग येथेच होणार…

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना. उद्धवजी ठाकरे साहेब आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख यांनी दिली मान्यता…

केंद्रीय आयुष मंत्री मा.ना.श्री. श्रीपाद नाईक यांचे आदेशानुसार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे  खासदार  विनायक राऊत यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने केंद्रीय आयुष मंत्रालयाने NIMP हा महत्वाकांशी प्रकल्प मौजे आडाळी ता.दोडामार्ग येथे मंजूर केला आहे.

मौजे आडाळी येथील एमआयडीसीच्या ५० एकर मोकळ्या जागेमध्ये हा प्रकल्प राबविण्याचे निश्चित झाले आहे. पश्चिम घाटातील दोडामार्ग परिसरात विविध प्रकारची औषधी वनस्पती असल्याने केंद्रीय आयुष मंत्रालयाने NIMP प्रकल्पाला आडाळी येथील जागेत पसंती दर्शविली होती. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा आयुष कार्यालयामार्फत ५० एकर जागेवरील प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार केला असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

आता महाराष्ट्र सरकारने आडाळी येथील जागेला अंतिम मान्यता दिल्याने परिपूर्ण प्रस्ताव लवकरच केंद्रसरकारच्या आयुष कार्यालयाकडे पाठविण्यात येईल.

संपूर्ण महाराष्ट्रातील NIMP चा एकमेव असलेला हा प्रकल्प मौजे आडाळी ता.दोडामार्ग येथे मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे, केंद्रीय आयुष मंत्री मा.ना. श्रीपाद नाईक, आणि महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री  अमित देशमुख यांचे खासदार  विनायकजी राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा.ना. उदयजी सामंत, आमदार  दिपकभाई केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 7 =