You are currently viewing कणकवलीत बचत गटांच्या वस्तुंचा नवतेजस्विनी महोत्सव उद्यापासून

कणकवलीत बचत गटांच्या वस्तुंचा नवतेजस्विनी महोत्सव उद्यापासून

कणकवलीत बचत गटांच्या वस्तुंचा नवतेजस्विनी महोत्सव उद्यापासून

आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन

कणकवली

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय व हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र, कणकवली यांच्यावतीने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ९ ते १२ मार्च या कालावधीत येथील पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलाखालील जागेत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे ‘नवतेजस्विनी महोत्सव २०२४’ या टॅगलाईनखाली तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या सकाळी ११.३० वाजता आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, तहसीलदार देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक अजय धुटे, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी उमा हळदवणेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटनानंतर दुपारी १ वाजता बचतगटातील महिलांचे गुणदर्शनपर कार्यक्रम, सायं. ५ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, ६ वा. ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम होईल. रविवार १० रोजी दुपारी ३ वा. महिलांसाठी पाककला स्पर्धा, सायंकाळी ६ वा. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रम, सोमवार ११ रोजी दुपारी २ वा. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे विविध योजनांचे मार्गदर्शपर कार्यक्रम होणार असून यात जिल्हा उद्योगचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी ३ वा. योजनांबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम, सायं. ६ वा. ऋतुजा सावंत व योगिता पवार यांच्या डबलबारीचा भजनाचा सामना होईल. मंगळवार १२ रोजी दुपारी २.३० वा. आपत्ती- व्यवस्थापन कार्यालय यांचा मार्गदर्शन व प्रात्यक्षिकपर कार्यक्रम, दुपारी ३.३० वा. ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मुकेश मेश्राम यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम, सायंकाळी ४ वाजता प्रदर्शन व विक्रीचा समारोप होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा