You are currently viewing दोडामार्ग येथे संत समाजाच्या वतीने “तपोभूमी दिनदर्शिका २०२३” चे वितरण

दोडामार्ग येथे संत समाजाच्या वतीने “तपोभूमी दिनदर्शिका २०२३” चे वितरण

दोडामार्ग :

 

दोडामार्ग तालुक्यात घरोघरी पूज्यनिय सदगुरु ब्रह्मेशांनंदाचार्य स्वामींच्या कृपाशिर्वादाने श्री. पद्मनाथ पीठ श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाची दिनदर्शिका २०२३ चे वितरण सेवा संत समाज – दोडामार्ग तर्फे भेट देवून करण्यात आले. या पिठाचे कार्य देव, देश, धर्म यावर आधारीत आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात हा संत समाज अग्रेसर आहे. गोरक्षा, गोसंवर्धन हे कार्य गुरुपीठाच्या मार्फत होत आहेत.

तपोभूमी दिनदर्शिका वितरणावेळी नगरपंचायत दोडामार्ग मध्ये नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितिन मणेरीकर यांना वितरीत करण्यात आली. या शुभ प्रसंगी दोडामार्ग क्षेत्रीय प्रमुख महेश शेटकर, अध्यक्ष सुभाष गवंडे, सचिव अजित कासार, खजिनदार दिनेश आमोणकर,दिया नाईक, मोहिनी रेडकर, उत्तम ठाकूर, उदय गावडे, दामोदर नाईक, रामा सावंत आदि उपस्थित होते.

यावेळी धर्म, सस्कृती, संस्कार हे दोडामार्ग मध्ये टिकून राहावे या करिता ‘आम्ही एक संस्कृती पाठशाळा सुरु करूया “अशी विन्नती संत समाजामार्फत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना करण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपल्या सहकार्याने दोडामार्ग मध्ये हे कार्य पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत नक्कीच अशी पाठशाळा दोडामार्गमध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले. याशिवाय दोडामार्ग पोलीस ठाणे व दोडामार्ग तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी वृंदालाही तपोभूमी दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 15 =