You are currently viewing भंडारी ज्ञाती बांधवांचेसाठी ८,९,१० मार्च रोजी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तालुका व जिल्हास्तर आयोजन   

भंडारी ज्ञाती बांधवांचेसाठी ८,९,१० मार्च रोजी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तालुका व जिल्हास्तर आयोजन  

भंडारी ज्ञाती बांधवांचेसाठी ८,९,१० मार्च रोजी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तालुका व जिल्हास्तर आयोजन

सावंतवाडी
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ, सावंतवाडी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्ग यांचे संयुक्त निषमाने दि. ८,९,१० मार्च २०२४ रोजी जिमखाना मैदान सावंतवाडी या ठिकाणी भंडारी ज्ञाती बांधवांचेसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तालुका व जिल्हास्तर आयोजित करण्यात आल्या आहेत.
या अनुषंगाने सकाळी ठीक ९ वाजता शिरोडा नाका सावंतवाडी येथून भव्य शोभा यात्रा (रॅली) निघणार आहे. शोभा यात्रा बाजारपेठ मार्गे जिमखाना येथे जाईल व त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेला शुभारंभ होईल व सामने सुरु होतील. या कार्यक्रमासाठी दि. ८ मार्च रोजी वेळेत उपस्थित राहून रॅली व स्पर्धांची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा