You are currently viewing भाई जगताप यांच्या निवडीबद्दल काँग्रेसकडून मालवणात आनंदोत्सव…

भाई जगताप यांच्या निवडीबद्दल काँग्रेसकडून मालवणात आनंदोत्सव…

मालवण
कामगारांचे डॅशिंग नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व प्रवक्ते आमदार अशोक ऊर्फ भाई जगताप यांची मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी व कार्याध्यक्षपदी चरणसिंग सप्रा यांची निवड झाल्याबद्दल आज सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शहरात भरड नाक्यावर नागरिकांना पेढे वाटून फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.
जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ता अरविंद मोंडकर म्हणाले, मुंबई काँग्रेसला अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले भाई जगताप हे कोकणातील असल्याने मुंबईत असलेल्या कोकणी चाकरमानी पदाधिकाऱ्यांना देखील चांगली ऊर्जा मिळालेली असून भविष्यात मुंबईत व कोकणात देखील काँग्रेस पक्ष वाढीला या निवडीचा नक्कीच फायदा होणार आहे. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, बाळू अंधारी, तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, पल्लवी तारी यांनीही आपले विचार मांडले. भाई जगताप यांची मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीपदी व कार्याध्यक्ष म्हणून चरणसिंग सप्रा यांच्या निवडीबद्दल नागरिकांकडून देखील शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, सरदार ताजर, इरफान शेख, प्रभाकर हेदुळकर, ममता तळगावकर, रिझवाना होलसेकर, तालुका युवक अध्यक्ष अमृत राऊळ, शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, सुबोध गावकर, जिल्हा युवक सचिव योगेश्वर कुर्ले, दिलीप तळगावकर, श्रीहरी खवणेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 16 =