You are currently viewing भांडुपच्या नवजीवन विद्यामंदिरातील माजी विद्यार्थ्यांचा आठवणीत रंगला स्नेह मेळावा

भांडुपच्या नवजीवन विद्यामंदिरातील माजी विद्यार्थ्यांचा आठवणीत रंगला स्नेह मेळावा

मुंबई

“आवडते मज मनापासुनी शाळा”, “लाविते लळा जशी माऊली बाळा”! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे.


याच पार्श्वभूमीर भांडुपच्या गणेश नगरातील नवजीवन विद्यामंदिरात शिक्षण घेत असलेले २००५ मध्‍ये दहावी .ब वर्गात असलेले माजी विद्यार्थी पुन्‍हा एकत्र १९ फेब्रुवारी २०२३ रोजी आले होते.यावेळी
नवजीवन विद्यामंदिर शाळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.
विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले होते.
आपल्या व्यस्त जीवनातून लहानपणीच्या शाळेबद्दलच्या आठवणी पुन्हा प्रफुल्लित करण्यासाठी प्रथमच
२००५ सालातील दहावी ब मधून शिक्षण घेऊन सर्व माजी विद्यार्थ्यांनी
१९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून
स्नेह मेळावा आयोजित केला होता.यावेळी
१८ वर्षांनी सर्वच विद्यार्थी
विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहात ह्याची प्रचिती आली.


अमेय किशोर गावडे यांनी सुचित करताना सांगितले की, आपल्या शाळेत *मराठी माध्यमाच्या काही गरीब, गरजू आणि होतकरु विद्यार्थीना* फी संदर्भात काही समस्या आहेत, तरी आपण सर्वांनी मिळून स्वइच्छेने आर्थिक स्वरुपी देणगी, गरजूंना एक मदतीचा हात देऊ शकलो तर त्यांना मदत होईल. सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ संमती देऊन. सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. समाजाचा एक भाग तसेच सामाजिक बांधिलकी म्ह्णून आपण आपल्या शाळेतील गरीब गरजु विद्यार्थीच्या फी संदर्भात व्यवस्थापनाने केलेल्या विनंतीचा मान राखून सढळ हस्ते शाळेस मदत करावी, दहावी – ब वर्गाच्या माध्यमातून जमा करुन दिनांक ३ मार्च २०२३ रोजी शाळेतील
सौ. अस्वार मॅडम (मुख्याध्यापिका) श्री. शेळके सर (उप-मुख्याध्यापक) तसेच श्री. पाटील सर (व्यवस्थापक) यांच्या उपस्थितीत ३० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी अमेय गावडे, स्वप्निल खानविलकर, दीपक बडबे, दत्तात्रय शिलिमकर,आदी उपस्थित होते
विद्यार्थी विद्यार्थिनी जवळजवळ १८ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता; तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे संस्थापक संचालक मुख्याध्यापक रा.शी सावंत सर यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी शाळेचा संपूर्ण शिक्षकवृंद या ठिकाणी उपस्थित होता. आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही भावूक झाल्याचे दिसून आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा