You are currently viewing श्री एकमुखी दत्त मंदिर….

श्री एकमुखी दत्त मंदिर….

संपादकीय…….

श्री एकमुखी दत्त मंदिर
आणि प.प.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पादुका मंदिर जीर्णोद्धार व सभामंडप बांधकामासाठी भक्तांना मदतीचे आवाहन…!!

सावंतवाडी, न्यू सबनिसवाडा येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं श्री एकमुखी दत्त मंदिर हे १३५ वर्षे जुने आहे व प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पादुका मंदिर हे १०४ वर्षे पुरातन आहे. शेकडो वर्षे जुनी असलेली ही छोटेखानी दोन्ही मंदिरे जिर्ण झालेली आहेत, तसेच मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कार्यक्रमाच्या वेळी तसेच रोजच्या आरतीच्यावेळी भक्तांना उभे राहण्यास, महाप्रसादास जागा अपुरी पडत आहे.. ही मंदिरे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली आहेत तसेच देवस्थान व स्थानिक सल्लागार उपसमिती, सावंतवाडी त्याचा सर्व कारभार पाहते.
श्री.गोविंद नारायण उकिडवे म्हणजेच नारोपंत उकिडवे हे श्री टेंबे स्वामींचे शिष्य. त्यांनी ध्यानधारणा करण्यासाठी खोली असावी म्हणून ही वास्तू बांधली त्यावेळी खोदकाम करताना त्यांना पादुका सापडल्या, आजही औदुंबर वृक्षाच्या खाली घुमटी बांधून त्या स्थापन केलेल्या आहेत. श्री.टेंबे स्वामी महाराजानी नारोपंतांना दिलेल्या संगमरवरी पादुका आजही मंदिरात दररोज पूजन केल्या जातात. नारोपंतांना वाटलं की ध्यानधारणेसाठी मंदिरात दत्त मूर्ती असावी म्हणून नरसोबाच्या वाडीतून परत येताना श्री एकमुखी दत्तांची मूर्ती कागल येथील बाजारातून स्वतःजवळ पैसे नसताना देखील तेथील दुकानदार, व्यापाऱ्यांच्या मदतीतून त्याकाळी २५ रुपयांना विकत आणली. परंतु त्यांना मूर्ती स्थापना करण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी ती मूर्ती माणगाव येथील दत्त मंदिरात नेऊन ठेवली. सहा महिन्यानी श्री दत्तगुरूंच्या आदेशानंतर स्वतः श्री टेंबे स्वामींनी ती एकमुखी दत्तमूर्ती सबनिसवाडा येथील मंदिरात १८८४ साली स्थापन केली, त्याला आज १३५ वर्षे पूर्ण झालीत.
सन १८८२ पासून २७ डिसेंबर १८८९ पर्यंत परमपूज्य परिव्राजिकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे वास्तव्य याच मंदिरात असलेल्या खोलीत होते. २७ डिसेंबर १८८९ साली पौष पंचमीला श्री टेंबे स्वामी महाराज भारत भ्रमणासाठी येथून बाहेर पडले ते नरसोबावाडी वरून पुढे गरुडेश्वर येथे गेले. सन १९१४ मध्ये गरुडेश्वर येथेच श्री टेम्बे स्वामींचे निर्वाण झाले. गुरूच्या जाण्याने नारोपंत व्यथित झाले, तेव्हा श्री टेंबे स्वामींनी नारोपंतांस स्वप्नात येऊन दृष्टांत देत सांगितले की, “मी कुठेच गेलेलो नाही, इथेच आहे”, आणि जशी गरुडेश्वरला महाराजांची समाधी आहे तशीच समाधी नारोपंतांकडून इथे करून घेतली. नारोपंतांनी गरुडेश्वर ला जशी समाधी आहे तशीच समाधी बांधून प.प. वासुदेवानंद सरस्वती
श्री टेंबे स्वामींचे पादुका मंदिर सन १९१६ मध्ये बांधले त्यास आज १०४ वर्षे पूर्ण होत आहेत. असे हे गुरू शिष्याचे अतूट नाते आपणास येथे पहावयास भेटते.
या एकमुखी दत्त मंदिराच्या परिसरात आल्यावर भक्तांना मानसिक समाधान भेटते. मंदिरासमोरील औदुंबराच्या वृक्षाच्या खोडावर स्वामींच्या पादुका प्रकट झाल्या आहेत. तसेच श्री गणेशाची मूर्ती खोडामध्ये असल्याचा भासही होतो. माणगाव दत्त मंदिर येथे जशी गुहा आहे तसाच गुहेचा आकार औदुंबराच्या बुंध्यात पहावयास भेटतो. स्वामींच्या मंदीरातील कार्यक्रमास आजपर्यंत कधीही कसल्या गोष्टींची उणीव भासली नाही, स्वामींनी सर्वकाही स्वतः करवून घेतलेलं आहे. असं हे सावंतवाडीतील जागृत दत्त स्थान आहे.
शेकडो वर्षे पूर्ण झालेली दोन्ही नंदिरे आज जीर्ण झालेली आहेत. दिवसेंदिवस मंदिरात भक्तांचा वावर वाढत आहे, मंदिराची लोकप्रियता पाहता भक्तगण देशभरातून इथे भेटी देतात. स्वामींचे नियमित कार्यक्रम, पूजा, आरती साठी मंदिराचा अंतर्भाग कमी पडतो, महाप्रसादासाठी सुद्धा सभामंडप नसल्याने लोकांना उन्हात, पावसात उभे राहावे लागते. आणि मंदिराचा परिसर सखल भागात असल्याने पावसाळ्यात पाणी साचते, चिखल होतो. त्यामुळे जीर्ण झालेल्या दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार तथा भक्तांना उभे राहण्यासाठी सभामंडप बांधण्याचे प्रत्यक्ष काम दिनांक २६ जानेवारी २०२० पासून हाती घेतलेले आहे.
प.प. श्री टेंबे स्वामींचा भक्त परिवार खूप मोठा आहे. हाती घेतलेलं कामही स्वामींच्या कृपेने लवकरच पूर्ण होईल. परंतु काम पूर्णत्वास जाण्यासाठी आपल्यासारख्या स्वामी भक्तांकडून, समाजातील दानशूर व्यक्तींकडून स्वामींच्या चरणी सेवा अर्पण होणे गरजेचे आहे. तरी सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे, त्यांनी शक्य ती मदत मग ती वस्तूरुप असेल अथवा आर्थिक स्वरूपात स्वामींच्या चरणी अर्पण करावी असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, सावंतवाडी यांनी केले आहे…!!

मदतनिधीसाठी बँक तपशील..
Shri Datta Mandir & Vasudevanand Saraswati Mandir, Sabniswada, Sawantwadi.
Sindhudurg Dist. Central Co-op Bank Ltd.
Branch:- Sawantwadi
A/C No. 022400000035171
IFSC Code:- SIDC0001022

वस्तुरुप देणगीसाठी संपर्क:-
श्री.जगदीश मांजरेकर: ९४२२३७९६०४
श्री.विनोद रेडकर : ९४२२०९६८७७

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − seven =