You are currently viewing ….स्मृतीगंध”

….स्मृतीगंध”

….स्मृतीगंध”
सावंतवाडी संस्थान आणि या संस्थेनचे जनकल्याणारी राजे आदरणीय हीज हायनेस स्व.बापूसाहेब महाराज. ज्या या राजेंचा उल्लेख राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रामराज्याचे राजा म्हणून केला होता. अशा संस्थानच्या राजमाता हर हायनेस स्व.सत्वशिलादेवी भोसले ( राणीसरकार) यांचा आज ८५,वा जन्मदिवस. आदरणीय राणीसरकार यांचे दुर्दैवी निधन होवून आज तीन वर्षे झाली.. तरी त्यांच्या आठवणी सतत मनात आणि जनातही घरं करून राहिलेल्या आहेत.
माझ्या कौटुंबिक आणि सामाजिक अनेक कार्यक्रमात त्या आवर्जून उपस्थित असायच्या. त्या गोड आठवणी़ची अनेक छायाचित्रे माझ्या सग्रही आहेत. माझी जेष्ठ कन्या स्नेहल हिने पुण्यातील भरतनाट्यमचे पोस्ट ग्रँज्यूएशन पूर्ण केल्यानंतर सावंतवाडी येथे तिचा न्रुत्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. मला आठवत त्यांची तब्येत बरी नसतानाही कलेची आवड आणि स्नेहलने एका हटके क्षेत्रात घेतलेले शिक्षण यासाठी सुमारे दोन तास या कार्यक्रमात उपस्थित होत्या. या छायाचित्रात तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रम कुमार आणि आमचे परममित्र माजी आमदार प्रमोदजी जठार,  आदरणीय राणीसरकार गेल्या पण त्यांच्या आठवणी आणि ते मौल्यवान क्षण आजही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सतत काहीतरी इनोव्हेटीव करण्याची उर्जा आणि प्रेरणा देत असतात…
आदरणीय राजमाताना विनम्र अभिवादन.

…..अँड.नकुल पार्सेकर….

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − 3 =