You are currently viewing ध्येयवेडा— मातृवेडा

ध्येयवेडा— मातृवेडा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ध्येयवेडा— मातृवेडा*

 

 

त्रिखंडी गाजते आहे

मातृवेड्याची ही उडी

ध्यास मातृभूची मुक्तता

ध्येयवेडा हा गडी —–१

 

रात्रंदिन विनायकास

ध्यास लागे स्वातंत्र्याचा

श्वासोश्वासी चाले त्याच्या

जप तिच्या सुटकेचा–२

 

सूर मारला समुद्री

रक्ताळलेल्या अंगाने

झेपावला किना-याकडे

बळ एकवटून जिद्दीने–३

 

देशमुक्ततेसाठी अशी

जाणली स्वतःची किंमत

न भूतो न भविष्यती

अचाट उडीची हिंमत.–४

 

स्वातंत्र्य देवतेची पूजा

बांधली या शूरवीराने

दास्य शृंखला तोडण्यास

सरसावला कळकळीने—५

 

दुमदुमली ही झुंज उडी

नोंद झाली इतिहासात

शौर्य,धैर्य,ध्येयध्यासाचा

संकेत ,बोध जनमानसात.—६

 

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

7020757854

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + one =