You are currently viewing शिवसेना वाढीसाठी संदेश पारकर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू -आ. वैभव नाईक

शिवसेना वाढीसाठी संदेश पारकर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू -आ. वैभव नाईक

*माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्याकडून संदेश पारकर यांच्यावर कौतुकाची थाप*

 

*वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव*

 

कणकवली :

संदेश पारकर यांच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कामे झाली आहेत. 25 व्या वर्षी संदेश पारकर सरपंच होते त्यापासून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यांच्याकडे पद असू दे अगर नसू दे तरी देखील संदेश प्रेमी विविध उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करतात. या जिल्ह्याच्या जडणघडणीत संदेश पारकर यांचा मोठा हातभार आहे. सरपंच व नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत संदेश पारकर यांनी केलेली विकास कामे आजही लोकांसमोर आहेत. न्याय मागण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी ते आजही झटत आहेत. आज संदेश पारकर आमदार नसले तरीही तेवढीच ताकद त्यांची आहे. महाराष्ट्रातील मंत्री,आमदार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देखील संदेश पारकर यांना न्याय देण्याचे काम केले.अशीच संधी त्यांना यापुढेही मिळेल.जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचे काम संदेश पारकर यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.

शिवसेना नेते व कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस कणकवलीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या प्रमुख उपस्थितीत संदेश पारकर यांचा केक कापून सत्कार करण्यात आला. कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव भेटवस्तू देऊन करण्यात आला. तर बचत गटांना कपाट देण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी संदेश पारकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कणकवलीतील मातोश्री मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात संदेश प्रेमींच्या गर्दीने पूर्ण हॉल खचाखच भरून गेला होता.

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी मी संदेश पारकर यांचा मामा या नात्याने येथे आलो आहे. संदेश पारकर यांच्या आजोळ म्हापसा गोवा येथे आहे. त्यामुळे त्यांना प्रेमाची व कौतुकाची थाप देण्यासाठी यापुढेही मी सातत्याने येत राहणार असे उद्गार त्यांनी काढले.यावेळी प्रमुख वक्त्यांनी संदेश पारकर म्हणजे संघर्ष, संदेश पारकर यांना मोठे पद मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत असतानाच पुढील काही महिन्यांनी होणाऱ्या कणकवली नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकवूया असे आवाहन देखील करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना संदेश पारकर यांनी माझ्याकडे पद असो किंवा नसो जनतेसाठी मी कार्यकर्ता म्हणूनच धावणार मी पदाची पर्वा केव्हा केलीच नाही असे सांगत सर्वांचे आभार मानले.

यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर व त्यांच्या पत्नी समृद्धी पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख व जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, बाळा भिसे, शहर प्रमुख शेखर राणे, बिडवाडी सरपंच सुदाम तेली, अवधूत मालणकर, रुपेश पावसकर, अपर्णा कोठावळे, माजी जि प सदस्य संजय आंग्रे, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष सावंत, नगरसेविका सुमेधा अंधारी, हरी खोबरेकर, माजी नगरसेविका हर्षा ठाकूर, युवासेना माजी जिल्हाप्रमुख ऍड.हर्षद गावडे आदि पदाधिकारी शिवसैनिक, संदेश प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 5 =