You are currently viewing त्रिखंडातली सावरकरांची उडी

त्रिखंडातली सावरकरांची उडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*—त्रिखंडातली सावरकरांची उडी*

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

हनुमंताने केले उड्डाण, झेप घेई आकाशी ।

जाळले रावणाच्या लंकेशी ।

घेतली भरारी शिवरायांनी, केले पलायन, रिपु समोरुनी

शतक विसावे गाजले, सावरकरांनी सागरास पालांडले।१ क्रांतिवीरांना कोंबले बोटीत जिथे श्र्वासही घेणे कठीण।

बोट थांबते कुठे,कधी याचा केला अभ्यास।शत्रुच्याच कैदेत|।२|बोटीवरील शौचालयाची खिडकी अति अरुंद घुसविले शरीर कवाडात।खरचटले,सोलले अंग ,

रक्तही होते वाहत।मारिली उडी खाऱ्या पाण्यात। असंख्य यातना साहून गेले पोहत मार्सेल्स बंदरात।

दुर्दैव भारताचे पकडले गेले ,पुन्हा कैदेत। अन्यायाने पाठविले अंदमानात।।३।।

फ्रान्सच्या अखत्यारीत कैदी विनायक।त्यांस केले ब्रिटिशांच्या स्वाधीन ।जनतेने उठवला आवाज अन् प्रधान मंत्री पायउतार। ब्रिटिशांची नाचक्की साऱ्या जगतात ।

अशी गाजली उडी,उडी गाजली त्रिखंडात।।४।।

 

।विद्या रानडे ,अंधेरी पूर्व मुं४०००६९

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − six =