You are currently viewing मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जानेवारीत सिंधुदुर्गात येणार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जानेवारीत सिंधुदुर्गात येणार…

जिल्ह्यातील पत्रकारांना शब्द; पत्रकार भवनाच्या उद्घाटनाचे आमंत्रण…

सिंधुदुर्गनगरी

येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री जानेवारीत सिंधुदुर्गात येणार आहेत, तसा त्यांनी शब्द दिला आहे. नुकतीच जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकार भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले आहे. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

दरम्यान जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव देवयानी वरसकर, खजिनदार ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष बाळा खडपकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =