कोल्हापुरी तांबडा – पांढरा रस्सा आता सावंतवाडीत…
सावंतवाडी
कोल्हापूरची चव आता सावंतवाडीकरांना शहरातच चाखता येणार आहे. कोल्हापुरी तांबडा – पांढरा रस्सा, चमचमीत चिकन-मटण जेवण सावंतवाडीत मिळणार असून ”सयाजी रेस्ट्रो”चं आज शानदार उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे आता कोल्हापूरी चव सावंतवाडीत चाखता येणार आहे. गांधी चौक येथील दतात्रय निवास या इमारतीत हे रेस्टॉरंट उभारण्यात आले आहे. सावंतवाडीकरांनी या कोल्हापूरी मेजवानीचा आस्वाद घ्यावा अस आवाहन उद्योजक उदय पारळे यांनी केलय. याप्रसंगी पारळे कुटुंबियांसह त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.