You are currently viewing ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचे आयोजन

‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचे आयोजन

‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

 महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे “नवतेजस्विनी” तालुका स्तरीय भव्य प्रदर्शन दि. 24 ते 27 फेब्रुवारी रोजी सावंतवाडी  गार्डन बाहेरील पटांगण, मोती तलाव जवळ आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समनवय अधिकारी नितीन काळे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा, परीतक्ता, भूमिहीन महिला अल्पभूधारक महिला व वंचित महिलासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य करीत आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग मध्ये माविम अंतर्गत ग्रामीण भागात 136 गावात, 1 हजार 14 बचत गटांच्या माध्यमातून एकूण 11 हजार 67 महिला तसेच शहरी भागात 58 वार्डात 275 बचत गटांच्या माध्यमातून एकूण 2 हजार 849 महिला असे एकूण 13 हजार 916 महिलांचे संघटन करण्यात आलेले आहे.

(नवतेजस्विनी) महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत माविम बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे “नवतेजस्विनी” तालुका स्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक 24 ते 27 फेब्रुवारी 2024 असे एकूण 04 दिवसाचे प्रदर्शनाचे उदघाटन दि.24 फेब्रुवारी  रोजी दुपारी 3 वाजता शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात शालेय मुलींचे दशावतार नाटक, खेळ पैठणीचा, महिला विविध गुणदर्शन कार्यकम इ. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा