You are currently viewing पत्नीच्या आजारपणाला कंटाळून 85 वर्षाच्या वृद्धपतीने केली आत्महत्या

पत्नीच्या आजारपणाला कंटाळून 85 वर्षाच्या वृद्धपतीने केली आत्महत्या

पत्नीच्या आजारपणाला कंटाळून 85 वर्षाच्या वृद्धपतीने केली आत्महत्या

देवगड

देवगड तालुक्यातील साळशी कुळ्याची वाडी येथील शशिकांत नारायण साटम वय ८५ यांनी आपल्या पत्नीच्या आजारपणाला कंटाळून आपल्या घराच्या दरवाजा लगत छप्पराच्या लाकडीवाशाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 21 मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळशी कुळ्याची वाडी येथील शशिकांत साटम यांची पत्नी गेली चार पाच वर्षापासून पॅरालिसिस या आजाराने आजारी असून तिचे सर्व विधी जागेवरच होत असल्याने तिच्या या आजारपणाला कंटाळून पती शशिकांत साटम यांनी अखेर आत्महत्येचे टोक गाठले. त्यांच्या घरी ही दोघे पती-पत्नीच राहत होती. या घटनेची खबर पोलीस पाटील कामिनी किशोर नाईक यांनी देवगड पोलीस स्टेशनला दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे . याबाबतच्या अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र महाडिक करत आहेत

 

प्रतिक्रिया व्यक्त करा