You are currently viewing स्मृति भाग ४९

स्मृति भाग ४९

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ४९*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

पुढे गायत्रीजपविधी अध्याय येतो .

 

*गायत्री वेदजननी गायत्री पापनाशिनी ।*

*गायत्र्या परमं नास्ति दिवि चेह च पावनम् ॥*

गायत्री वेदांची माता आहे . गायत्री पापांचा नाश करणारी आहे . द्युलोक व इहलोकात गायत्रीपेक्षा श्रेष्ठ व पवित्र करणारं कुणीही नाही .

ज्या गायत्रीचा जप हा द्विज म्हणजे ब्राह्मण , क्षत्रिय आणि वैश्य यापैकी ९०% जणांनी सोडलाय !! काय भारत आहे !! जगातला कुठला धर्म जाति नसलेला आहे ? विवाहाचे नियम कुठल्या धर्मात नाहीत ?? जप तप कुठल्या धर्मात नाहीत ? तरी भारतातीलच काही कर्मदरीद्री नेतृत्व धर्मनिरपेक्षता , आंतर्जातीय विवाह , आंतर्धर्मीय विवाह , जाती नाहिशा केल्या पाहिजेत , उपास्य दैवते विरोधी वक्तव्याचे स्वातंत्र्य !! यावर चर्चा करुन भारतीय संस्कृति बुडवण्याचे कार्य निलाजरेपणाने करत असतात !!! त्यात अभ्यास नसणार्‍या भारतीय न्यायालयाचीदेखिल अन्यायी भूमिका सौंदर्याने वठलेली असते !!

उपांशु जप शंभरपट व मानसिक जप हजारपट फळ देतो . सावित्री हे गायत्रीचे दुसरे नाव आहे . मनाच्या संयमिततेने व भक्तिने जप करावा . असे सांगून पुढे तर्पणविधी अध्याय येतो .

या तर्पणविधीत प्रथम भगवान शेष , नंतर काल , अग्नि , रुद्र , रुक्मभौम , श्वेतभौम , पश्चात सप्तपाताल , जम्बुद्वीप , शाकद्वीप , गोमेद , पुष्कर , शाकाख्य द्वीप , तत्पश्चात शार्वर , स्वधामान , हिरण्यरोमा , मग कल्पापर्यंत टिकणार्‍या लोकांना तृप्त करावे . ( माहिती वाचूनच तृप्तता येते ! मग कृति केल्यावर येणारच !! ) मग लवणसागर , क्षीरसागर , घृतसागर , इक्षुसागर , स्वादुसागर , या सात समुद्रांना पुरुषसूक्ताद्वारे जलाञ्जलि द्यावी व पुष्प अर्पण करावे . नंतर पितरांचा तर्पणाचा नंबर येतो . पितृयज्ञ करुन पितरांना प्रसन्न करावे , हे सांगितले आहे .

मग ब्राह्मण परिक्षा वर्णन येते . यात देवकार्यासाठी ब्राह्मण परिक्षा करु नये , पण पितृकर्मात ती उचित असते , असे सांगून पंक्तिपावन ब्राह्मणाचे गुणवर्णन केले आहे . श्राद्धात दान काय द्यावे व देवू नये याची व कधी करावे व करु नये याची चर्चा केली आहे . कुठे करावे व कुठे करु नये हे सांगितले आहे . पितर गण मनुष्याने केलेल्या श्राद्धाने प्रसन्न होवून सन्तान , पौष्टिकता , कीर्ति , स्वर्ग , नीरोगिता व धन प्रदान करतात , हे सांगितले आहे . मग जननमरण शौचाध्याय , द्रव्यशुद्धिवर्णन , मलमूत्रपश्चात शुद्धि , आणि शेवटी कुठले पापकर्म केल्यावर कोणते व्रत केल्यास शुद्धि होते ? याचे दोन अध्याय येतात .

मलमूत्र विसर्जनपश्चात जल व मृत्तिकेने शुद्धि करावी असे विधान आहे व त्याने दुर्गंध जातो हे सांगितले आहे . केवढा बारीक गोष्टीचा उल्लेख ! धन्य आहे ऋषिंची !!!! आज ही एखाद्या कैद्याच्या उत्तम वागणुकीवर वा पश्चात्ताप दग्धतेवर त्याची ठराविक वेळे आगोदर सुटका होते , हे जर दृश्य असेल तर आपण केलेल्या पापाचे आपण प्रायश्चित्तपर व्रत आचरुन शुद्ध होवू शकत नाही का ? हा विचार सर्वच भारतीयांनी करण्यासारखा आहे . या वरुन ऋषि किती दीर्घदृष्टि व द्रष्टे होते याची जाणीव ज्या भारतीयास होत नाही तो पशुतुल्यच म्हणावा ना ????

आज थांबतो . विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + fourteen =