You are currently viewing रयतेचा आधारवड

रयतेचा आधारवड

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा कोमसाप मालवण शाखा सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रयतेचा आधारवड*

 

रयतेचा आधारवड

हिंदवी स्वराज्य संस्थापक

स्वराज्याच्या रणनीतीचा

वीर कुशल प्रशासक

 

जिजाऊंच्या संस्कारांचे

बाळकडू पिऊनी घडला

रयतेच्या रक्षणासाठी

रणांगणी वीर लढला

 

परस्रीला आई मानुनी

दिला सन्मानाचा पाट

अब्रू लुटारू गनिमांचा

केला समूळ नायनाट

 

गनिमी कावा रचुनी

केले शत्रूस पराभूत

लाविले जीवन पणास

वीरपुरुष हा अद्भूत

 

देऊनी फितुरांस शिक्षा

न्यायी राजा झळकला

शिवाजी तेजस्वी तारा

इतिहासात चमकला

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*✒️©सौ.आदिती मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =