दुर्वांकुर ज्वेलर्सचे सुहास मालवणकर यांचे निधन

दुर्वांकुर ज्वेलर्सचे सुहास मालवणकर यांचे निधन

कुडाळ
कुडाळ – बाजारपेठ येथील प्रसिद्ध सुवर्णकार व दूर्वांकुर ज्वेलर्सचे मालक सुहास नरहरी मालवणकर (५०) यांचे पडवे येथील लाईफ टाईम रुग्णालयात गुरुवारी सकाळी निधन झाले. ते मूळ आरोस (सावंतवाडी ) येथील रहिवासी, तर व्यवसायानिमित्त ते बरीच वर्षे कुडाळला स्थायिक झाले. सध्या ते कुडाळ – एस एन देसाई चौक येथे वास्तव्यास होते.

त्यांच्या निधनानंतर कुडाळ शहरावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ,भावजय व अन्य परिवार आहे. दूर्वांकुर ज्वेलर्सचे मालक आनंद मालवणकर यांचे ते बंधू होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा