You are currently viewing मराठी वाङ्मय परिषद, बडोदे कडून आसावरी इंगळे सन्मानित

मराठी वाङ्मय परिषद, बडोदे कडून आसावरी इंगळे सन्मानित

*मृत्युंजय कादंबरीच्या रसास्वादला प्रथम पुरस्कार*

गुजरात :

मराठी वाङ्मय परिषद, बडोदे या वर्ष १९३१ मध्ये स्थापित संस्थेतर्फे आयोजित ‘रसास्वाद’ स्पर्धेत आसावरी इंगळे यांच्या ‘मृत्युंजय’ कादंबरीच्या रसास्वादला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. १८ फेब्रुवारी रोजी बडोदा येथे खुसखुशीत लेखनासाठी सुप्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ लेखिका मंगलाताई गोडबोले यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले.

यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये आसावरी इंगळे यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई या सरकार मान्य संस्थेतर्फे ‘अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार’ व ‘न्यायप्रभात साहित्यरत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार, २०२४’ तसेच ‘तितिक्षा इंटरनॅशनल’ तर्फे ‘आंतरराष्ट्रीय तितिक्षा साहित्यभूषण प्र.के.अत्रे स्मृती पुरस्कार २०२३’ असे तीन सन्माननीय पुरस्कार प्राप्त झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 17 =