घोटगे कबड्डी लीग च्या पहिल्या पर्वात धारेश्वर फायटर्स विजेता…

घोटगे कबड्डी लीग च्या पहिल्या पर्वात धारेश्वर फायटर्स विजेता…

दोडामार्ग

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त, जि. प शिक्षण व आरोग्य सभापती मा.डॉ.अनिशा दळवी पुरस्कृत तालुका स्तरीय घोटगे कबड्डी लीग स्पर्धा २०२१ श्री सातेरी मंदिराच्या मैदानावर संपन्न झाली,यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवी,भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण गवस,घोटगे माजी उपसरपंच संदीप दळवी,संजय दळवी,राजाराम दळवी,विद्यानंद दळवी,सहदेव दळवी,कानू दळवी आदी उपस्थित होते. लीगची ही स्पर्धा गाव मर्यादित आयोजित केली असून अनेक संघ सहभागी झाले होते. साखळी पद्धतींनी खेळवलेली ही स्पर्धा उत्कृष्ट आयोजनात संपन्न झाली. स्पर्धेमध्ये सातेरी वारीअर्स संघमालक अनिरुद्ध दळवी,धारेश्वर फायटर्स संघमालक सचिन दळवी, स्वयंभू फायटर्स संघमालक सुहास दळवी,मराठा वारीअर्स संघमालक रामा दळवी,हे संघ सहभागी झाले होते . या संपुर्ण स्पर्धत धारेश्वर फायटर्स संघाने सातेरी वॊरीअर्स संघावर मात करत विजेतेपद मिळवले.विजेत्या संघास रोख रक्कम व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघास रोख रक्कम व आकर्षक चषक (जि. प शिक्षण व आरोग्य सभापती मा.डॉ.अनिशा दळवी यांच्या कडून पुरस्कृत) देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत चढाई पटू सर्वेश दळवी, उत्कृष्ट पकडपटू आदेश दळवी , उदयोन्मुख खेळाडू प्रसाद दळवी,तर अष्टपैलू खेळाडू रितेश दळवी यांनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पंच पॅनेल व ग्रामस्थांनी विशेष काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा